Jalgaon Police Transfer: पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे रेड्डींनी स्वीकारली! शुभेच्छांसह एम. राजकुमार यांना निरोप

जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदावर पदोन्नतीने बदली झाली असून, त्यांच्या जागी एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Police Transfers
Police Transfersesakal
Updated on

जळगाव : जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदावर पदोन्नतीने बदली झाली असून, त्यांच्या जागी एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री. रेड्डी यांनी आज जिल्‍हा पोलिस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला असून, एम. राजकुमार यांना जळगावकर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, सहकारी अधिकाऱ्यांनी शुभेच्छांसह शब्दसुमनांनी निरोप दिला. (Reddy accepted post of Superintendent of Police Best regards In Farewell to M Rajkumar Jalgaon police transfer)

जिल्‍हा पोलिस दलाच्या मंगलम सभागृहात एम. राजकुमार यांचा निरोप समारंभ आणि नूतन पोलिस अधीक्षक रेड्डी यांचा स्वागत समारंभ झाला. एम. राजकुमार यांच्या हस्ते महेश्वर रेड्डी यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा देण्यात आल्या.

अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, श्रीमती नेरकर, उपअधीक्षक संदीप गावित यांच्यासह सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. श्री. गावित यांनी राजकुमार यांच्या कार्यकाळाबाबत सांगितले, की १५ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी १४ अनुकंपाधारकांना महसूल विभागात नोकरी मिळवून दिली.

रामानंदनगर पोलिस ठाण्यासाठी नवी जागा मिळवून दिली. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले. प्रशासकीय गतिमानता आणली. पंधराच महिन्यांत ५६ गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली.

Police Transfers
Nashik Police Transfer : पंचवटी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी मधुकर कड; सोहन माछरे यांची बदली

जिल्ह्यात घडलेल्या दंगलींवर वेळीच नियंत्रणही मिळाले. गुन्हेशोधात जिल्हा अग्रक्रमाने पुढे राहिला. तोच वेग नूतन पोलिस अधीक्षक रेड्डी यांच्याही कार्यकाळात आम्ही अबाधित राखू, असे आश्वासनही दिले. महापौर जयश्री महाजन, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रताप पाटील, सामाजिक कार्यात सहभागी असणारे मुकुंद मेटकर, अयाज अली, रतन गिते, चेतन वाणी आदींनी मनोगत व्यक्त केले.

पुष्पच्छादीत जीप ओढून निरोप

एम. राजकुमार यांना शुभेच्छा देणाऱ्यांनी कार्यक्रमातच खूप गर्दी केली होती. सर्व अधिकारी, कर्मचारी आणि शहरवासीयांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी पुष्पाच्छादीत जिप्सीत सपत्नीक एम. राजकुमार आरूढ झाल्यावर नूतन पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह अधिकाऱ्यांनी मंगलम सभागृहापासून पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत जीपचा दोर ओढून निरोप दिला.

Police Transfers
Nashik Police Transfer : पंचवटी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी मधुकर कड; सोहन माछरे यांची बदली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com