Jalgaon News : नोंदणीकृत दस्तऐवज आता ई-मेलवर मिळणार : मुद्रांक जिल्हाधिकारी सुनील पाटील

Stamp paper
Stamp paperesakal

Jalgaon News : कोणतीही मालमत्ता, शेत खरेदी-विक्री करताना दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी मुद्रांकशुल्क भरून व्यवहार करता येतो. नोंदणीचे दस्तऐवज मिळण्यासाठी काही तासांची वाट पाहावी लागत होती.

आता मात्र संबंधित नोंदणी वेळीच खरेदी-विक्रेत्यांनी आपला मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी दिल्यास त्यांना नोंदणीची प्रत ई-मेलवर मिळणार आहे, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी सुनील पाटील यांनी दिली. (registered document will now be received by e mail jalgaon news)

खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना संबंधित स्टॅम्प वेंडर मुद्रांकशुल्क भरून स्टॅम्प पेपरवर खरेदी-विक्रीचे व्यवहार लिहून देतो. त्यावर दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या, साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या झाल्या, की दुय्यम निबंधक कार्यालयात त्या दस्ताची नोंदणी करणे, नंतर सर्व कागदपत्रे स्कॅन करणे, नंतर दुय्यम निबंधक अधिकारीने ते तपासणी करून खरेदीदार, विक्रेता, साक्षीदारांच्या चेहरा ओळख व स्वाक्षरी घेतो. नंतर खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर सही करतो. या

प्रक्रियेसाठी किमान अर्धा ते पाऊण तास वेळ लागतो. नोंदणी ते कागदपत्रे स्कॅन करण्यापर्यंतची सर्व प्रक्रियेचा एसएमएस संबंधितांच्या मोबाईलवर येणार आहे.

त्यासाठी दस्तऐवज नोंदणी करताना दस्त निष्पादीत करून देणारा व घेणारा सर्व पक्षकारांनी त्यांचे कार्यान्वित असलेले भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी दस्तांवर टाकावयाचे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Stamp paper
Voter Registration App : नवीन मतदारांनो, ‘घरबसल्या’ नावनोंदणी करा; व्होटर हेल्पलाईनचा घ्या लाभ...

म्हणजेच त्यावरून पक्षकाराला आपल्या दस्ताची स्थितीची माहिती मोबाईलवरून मिळणार आहे. ई-मेलवर दस्ताची सॉफ्ट कॉपी उपलब्ध होते. ही दस्ताची कॉपी ई-मेल असल्यामुळे भविष्यात सुलभ संदर्भासाठी लगेच दस्ताची प्रत आपल्याला मिळते.

"नागरिकांनी दस्त नोंदणी करताना नोंदणी व मुद्रांक विभागाने उपलब्ध करून दिलेल्या ‘आय-सरिती’ प्रणालीमध्ये आपले मोबाईल क्रमांक, ई-मेल आय.डी., तसेच पत्ते समाविष्ट करावे. ते अचूक असल्याची खात्री करावी. यामुळे संबंधितांना ई-मेलवर नोंदणी दस्त कायमस्वरूपी आनलाइन स्वरूपात ठेवता येणार आहे." -सुनील पाटील, मुद्रांक जिल्हाधिकारी

Stamp paper
Chandrayaan 3 : ‘चांद्रयान-३’साठी जळगावच्या पुत्राची महत्त्वपूर्ण भूमिका!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com