Online Electricity Bill : जळगाव परिमंडलात वीजबिल ऑनलाइन भरण्यास प्रतिसाद!

Online Electricity Bill Payment
Online Electricity Bill Paymentesakal
Updated on

जळगाव : महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन पेमेंट सुविधांचा वापर करीत राज्यातील महावितरणच्या घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वर्गवारीतील एक कोटी ११ लाख ५३ हजार ७०३ लघुदाब ग्राहकांनी नोव्हेंबरमध्ये ऑनलाइन पेमेंटचा पर्याय स्वीकारला, तर जळगाव परिमंडलात चार लाख ७८ हजार ८८० ग्राहकांनी ८० कोटी ३१ लाख रुपये भरले आहेत. (Response to pay electricity bill online in Jalgaon news)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Online Electricity Bill Payment
Nashik News : हिवाळ्याची चाहूल अन् सिन्नरकरांची मैदानावर गर्दी!

प्रत्येक ग्राहकाला ऑनलाइन पेमेंटवर ०.२५ टक्के सवलत मिळत आहे. त्यामुळे ऑनलाइन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. वीज ग्राहक संगणक किंवा ॲपच्या मदतीने वीजबिल भरू शकतात. यामुळे ग्राहकांचा वेळ वाचत आहे. ग्राहक महावितरणच्या ॲप किंवा संकेतस्थळावर चालू किंवा थकबाकीची देयके पाहू शकतात. तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारही वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

पावणेनऊ कोटींचा भरणा

नोव्हेंबरमध्ये जळगाव मंडलातील तीन लाख २६ हजार १७९ ग्राहकांनी ५१ कोटी सहा लाख, धुळे मंडलातील एक लाख एक हजार ५०० ग्राहकांनी २० कोटी ५० लाख, तर नंदुरबार मंडलातील ५१ हजार २०१ ग्राहकांनी आठ कोटी ७५ लाखांचे ऑनलाइन वीजबिल भरले आहे.

Online Electricity Bill Payment
Nashik News: नदीपात्रात शोधाव्या लागतात मोकळ्या जागा; नगररचना आराखड्यात जागा शिल्लक नसल्याचा परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com