Jalgaon News : हक्काचे पाणी गेले वाहून; वाया जाणाऱ्या पाण्यावर नदीजोडचीच मात्रा

river
riveresakal

भडगाव (जि. जळगाव) : तापी आणि गिरणामधून पावसाळ्यात गुजरातेत वाहून जाणाऱ्या पाण्याचा जिल्ह्यात वापर करण्यासाठी जिल्ह्यांतर्गत नदीजोड प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. तसे झाल्यास जिल्ह्यातले पाणी जिल्ह्यासाठी उपयोगात येईल, पर्यायाने जिल्हा सिंचनाच्या बाबतीत समृद्ध होईल. याशिवाय दोन्ही नद्यांवरील प्रलंबित प्रकल्पांना तातडीने चालना देऊन ते पूर्णत्वास नेण्यासाठी पक्षीय जोडे बाजूला ठेवून शासनावर दबाव निर्माण करणे गरजेचे आहे. (responsibility of peoples representatives to complete pending projects on tapi & girna rivers jalgaon news)

तापी आणि गिरणा नदीतून पावसाळ्यात दर वर्षी मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. यंदाच्या पावसाळ्यातली वाहून जाणाऱ्या पाण्याची आकडेवारी तर झणझणीत अंजन घालणारी आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रकल्प आठ वेळा भरले असते एवढे पाणी या दोन्ही नद्यांतून वाहून गेले. त्यामुळे या वाहून जाणाऱ्या पाण्याचा जिल्ह्यासाठी फायदा केव्हा होईल, असा प्रश्न आता जिल्ह्यातील तहानलेल्या शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

नदीजोडला मिळावी गती

नार-पार या पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गिरणा खोऱ्यात टाकण्याची योजना शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र ही योजना अद्याप कागदावरच आहे. ती प्रत्यक्षात केव्हा पूर्णत्वास येईल, हे सांगणे तुर्तास अवघड आहे. मात्र सद्य:स्थितीला जिल्ह्यात उपलबद्ध असणारे पाणी जिल्ह्यातच कशा पद्धतीने अडविले जाईल, हे पाहणे जिल्ह्यासाठी व्यावहारिक ठरणारे आहे. गिरणा धरण नेहमीच ओव्हरफ्लो होते असे नाही. मात्र तापीतून कायमच बेसुमार पाणी वाहून जाते. त्यामुळे तापीचे पाणी गिरणा खोऱ्यात वळविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. गिरणेच्या ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्याचाही चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, पारोळा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर या तालुक्यातील प्रकल्प भरण्यासाठी उपयोग झाला पाहिजे.

८१ हजार हेक्टर ओलिताखाली येणार

गिरणा व तापीवरील रखडेले प्रकल्प पूर्ण झाल्यास तब्बल ८१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे तापीवरील शेळगाव बॅरेजची उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळणे आवश्यक आहे. त्यातून ११ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. पाडळसे प्रकल्पाने ५४ हजार हेक्टर क्षेत्र भिजणार आहे, तर गिरणावरील बलून बंधाऱ्यातून साडेसहा हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे. वरखेडे प्रकल्पाच्या कालव्यातून आठ हजार हेक्टर क्षेत्रावर पाणी पोचणार आहे. त्यामुळे या सर्व प्रकल्पात पाणी अडवून ते शेतापर्यंत पोचण्यासाठी कालव्याच्या कामाला गती देणे आवश्यक आहे.

हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

river
Jalgaon Crime News : रिक्षातून ओढून महिलेवर चाकू हल्ला प्रकरणी चुलत सासऱ्यास सश्रम कारवास!

नद्याजोडचा ‘डीपीआर’ बनवावा

जिल्ह्यातून गिरणा व तापीतून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी जिल्ह्यातच वळवून अडविण्यासाठी डीपीआर बनवणे आवश्यक आहे. गिरणेचे पाणी कालव्याच्या माध्यमातून पारोळा तालुक्यात जाते, त्यातून तेथील प्रकल्प भरले जातात. त्यात अजनू कालवे सक्षम होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हतनूर प्रकल्पाला अजून एक कालवा काढून ते पाणी तुटीच्या गिरणा खोऱ्यात वळविले तर पूर्ण जिल्हा पाण्याच्या बाबतीत समृद्ध होऊ शकतो. अर्थात त्यासाठी मोठ्या राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. इतरही नद्याजोडचे रखडले प्रकल्पांना चालना देणे आवश्यक आहे.

"नार-पार पाणी तुटीच्या गिरणा खोऱ्यात आणण्यासाठी लढा सुरूच आहे. मात्र तापी आणि गिरणामधून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणीही अडविणे आवश्यक आहे. हतनूर प्रकल्पाचा गाळ उपसण्यात यावा अन्यथा तेथे नव्याने प्रकल्प करण्यात येऊन कालव्याच्या माध्यमातून ते पाणी गिरणा खोऱ्यात वळविण्यात यावे. ते तांत्रिकदृष्ट्याही शक्य आहे."

- विकास पाटील, अध्यक्ष- उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ

river
Jalgaon News : आणखी 22 शेतकऱ्यांना मिळणार जमिनी; सावकारी पाशातून मुक्ततेसाठी जलद सुनावणी सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com