Onion Export Ban : केंद्र सरकारच्या निर्यात बंदीचा परिणाम, पारोळ्यात कांदा 100ला 4 किलो

Consumers buying vegetables and onions in the market
Consumers buying vegetables and onions in the marketesakal

Onion Export Ban : येथील बाजारपेठेत चार- पाच दिवसांपूर्वी ७० ते ८० रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा सध्या २५ रुपये किलो दराने विकला जात आहे.

कांद्यांच्या भावात झालेल्या या घसरणीमुळे गृहिणी सुखावल्या असल्या तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे.(result of central government export ban 4kg of onion per 100 in Parole jalgaon news)

केंद्र सरकारने निर्यात बंदी लागू केल्याने शंभरी गाठणाऱ्या कांद्यांचे दर अत्यंत कमी झाले आहेत. त्यामुळे उपहारगृह, हॉटेल व भेळच्या दुकानात पत्ताकोबी ऐवजी आता कांदा मिळू लागला आहे. दैनंदिन जीवनात कांद्यांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक भाजीत किंवा जेवणाच्या वेळी कांदा महत्त्वपूर्ण असतो. पंधरा दिवसांपूर्वी कांद्यांच्या भावाने सत्तरी गाठल्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबातून कांदा जवळपास गायब झाला होता.

येथील आठवडे बाजारात मोजक्याच विक्रेत्यांकडे कांदा दिसून येत होता. मात्र, दरात झालेल्या घसरणीमुळे बाजारात बऱ्याच जणांकडे कांदा विक्रीसाठी दिसून येत आहे. दुसरीकडे एकरी पन्नास हजार रुपये खर्च करून बाजारात विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला आता कवडीमोल भाव मिळत असल्याने केलेला खर्च देखील मिळणार नसल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

भरीत वांगे ७० रुपये किलो

सोमवारी (ता. १८) चंपाषष्ठी असल्यामुळे भरीताच्या वांग्यांना चांगलाच भाव आला आहे. आतापर्यंत ४० ते ५० रुपये किलो दराने मिळणारे भरीताचे वांगे आजच्या बाजारात ७० ते ८० रुपये किलो दराने विकले गेले.

दरम्यान, वांग्यांचे भाव काहीसे वाढलेले असले तरी चंपाषष्ठीला वांग्याच्या भरीताचा नैवेद्य बहुतांश घरी दाखवला जात असल्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

Consumers buying vegetables and onions in the market
Onion Export Ban: कांदा निर्यात धोरणाच्या धरसोडवृत्तीमुळे परकीय बाजारपेठ गमविण्याची वेळ! शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका

शेतकरी शेतात कष्ट करून पिकांना मोठे करतो. एवढे कष्ट घेतल्यानंतर जेव्हा बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही, तेव्हा उत्पादन खर्च देखील निघत नाही. कांद्याचे भाव कमी झाल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसणार आहे.

''शेतकऱ्यांच्या घरी माल असतो, तेव्हा भाव नसतात आणि हाच माल व्यापाऱ्यांकडे गेल्यानंतर लगेचच भाव वाढ केली जाते. हे धोरण बदलणे गरजेचे असून कांद्यांना सरकारने वाढीव भाव दिला पाहिजे.-विनोद पाटील, कांदा उत्पादक शेतकरी

''शेळावे बुद्रूक (ता. पारोळा) दरम्यान तालुक्यासह नंदुरबार येथून कांदा विक्रीस आणला जातो. ग्राहकांचे समाधान व्हावे यासाठी नफा न बघता ग्राहकांना सर्व भाजीपाला एकाच ठिकाणी मिळावा या अपेक्षेने भाजीपाला सर कांदा विक्रीसाठी ठेवला जातो. दरम्यान अनेक वेळा साठवणूक ठेवलेला कांदा घट व कुजल्यामुळे नफा कमी होण्याची शक्यता असते.''-गोपाल महाजन, पारोळा भाजीपाला विक्रेता.

Consumers buying vegetables and onions in the market
Onion Export Ban: निर्यातबंदीनंतर कांदा दोन ते अडीच हजारांवर! शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदरा कोण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com