
Bhusawal : सव्वा कोटींच्या शेत रस्त्यांना मंजुरी
भुसावळ (जि. जळगाव) : मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या (Financial Year) पुरवणी आराखड्यास मान्यता देण्यात आली असून त्यानुसार भुसावळ तालुक्यातील शेती रस्त्यांना (Farm Roads) मंजुरी देण्यात आली आहे. (Rs 1 crore 25 lakhs Sanctioned for farm roads in bhusawal Jalgaon News)
शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्याने पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार रोजगार हमी योजनेतून ही रस्त्यांना मंजुरी मिळाली.
हेही वाचा: Jalgaon : अल्पवयीन मुलाचे अपहरण
या रस्त्यांना मिळाली मंजुरी
जोगलखेडा (ता. भुसावळ) येथील सुमनबाई बुधो कोळी यांच्या शेतापासून ते दौलतपुर रस्ता भोरटेक रस्ता क्रमांक ११५ पर्यंत एक किमी रस्ता, जोगलखेडा (ता. भुसावळ) येथील गिरधर पाटील यांच्या शेतापासून ते सुनील कोळी गट क्रमांक ४५ पर्यंत एक किमी रस्ता, जोगलखेडा (ता. भुसावळ) येथील गोकुळ पाटील यांच्या घरापासून विलास पाटील यांच्या शेतापर्यंत १ किमी रस्ता, साकेगाव (ता. भुसावळ) येथील दत्तनगर वांजोळा रोडपासून ते दोनमोरी रेल्वे लाईनपर्यंत १ किमी रस्ता, निवृत्ती पाटील यांच्या शेतापासून ते जगतराव मराठे यांच्या शेतापर्यंत १ किमी रस्ता अशा भुसावळ तालुक्यातील एकूण ५ किलोमीटर म्हणजे १ कोटी २५ लाख रुपये किंमतीच्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
हेही वाचा: Jalgaon : अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी वाढदिवशी गाण्यावर धरला ठेका
Web Title: Rs 1 Crore 25 Lakhs Sanctioned For Farm Roads In Bhusawal Jalgaon News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..