Jalgaon Crime : वाळू चोरट्यांच्या मदतीला धावून आले तराफे; गिरणा पात्रातून ‘पुष्पा स्टाईल’ वाळू चोरी

Sand theft on rafts in girna river jalgaon crime news
Sand theft on rafts in girna river jalgaon crime newsesakal

Jalgaon Crime : धानोरा (ता. जळगाव) शिवारातील गिरणा नदी पात्रातून वाळूचा प्रचंड उपसा सुरुच आहे. चोरीची वाळू वाहुन नेण्यासाठी लाकडी ओंडक्यांचे तराफे करुन वाळू माफियांनी मानव विरहीत बोटींद्वारे वाळू चोरुन नेण्यास सुरवात केली आहे.

तालुका पोलिसांनी धानोरा शिवारात धडक दिल्यावर हा प्रकार आढळून आला असून, अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस-महसुल विभागाने ट्रॅक्टर-डंपर जप्तीनंतरही वाळूचा धंदा सुरुच असल्याने या घटनेवरुन पोलिस-महसुलच्या पुढे चोरट्यांचे डोके चालते हे अधोरेखीत झाले आहे. (Sand theft on rafts in girna river jalgaon crime news)

वाळू लिलाव बंद असतांना जिल्ह्यात बेसुमार वाळू उपसा सुरुच आहे. जिल्‍हा प्रशासन, पोलिस, आरटीओ आणि खबऱ्यांना चुकारा देत वाळू माफिया वेगवेगळ्या शक्कल लढवून वाळूची चोरी करुन विक्री करत आहेत. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जिल्हा प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली.

असे असताना वाळूमाफियांनी आता लाकडी ओंडक्यांचे तराफे बनवून त्यावरून वाळूची वाहतूक सुरु केली आहे. धानोरा शिवारातील गिरणा नदी पात्रातून तराफ्यांच्या सहाय्याने वाळूची चोरी होत असल्याची गुप्त माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे परिविक्षाधिन पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.

अशी केली कारवाई

सोमवारी (ता. २८) सकाळी नऊला महसूल विभाग आणि तालुका पोलिसांना धानोरा शिवारातील गिरणा नदी पात्रातून तराफ्याच्या सहाय्याने वाळू चोरी होत असल्याचे दिसून आले. या संयुक्त पथकाने ताराफे ताब्यात घेत त्यावरुन चोरुन नेली जाणारी १ ब्रास वाळू जप्त केली आहे. याप्रकरणी मंडळाधिकारी किरण बाविस्कर यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक गुलाब माळी तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sand theft on rafts in girna river jalgaon crime news
Jalgaon Crime: शाहुनगरात पैशांच्या वादातून 2 गटात घमासान; दंगलीचा गुन्हा दाखल

‘पुष्पा स्टाईल’ तराफे मदतीला

अवैध धंदेवाईक कुठलाही असो, त्याला त्यांच्या व्यवसायाचे लक्ष गाठणे हे एकमेव गणित माहिती असते. त्यासाठी मग पैसा आणि प्रसंगी प्राणाची बाजी लावण्याासही ही मंडळी मागेपुढे पाहत नाही. पुष्पा चित्रपटात अशाच पद्धतीने लालचंदनाची तस्करी करताना पोलिसांचा छापा पडतो अन्‌ पुष्पा नावाचा ॲक्टर सर्व लालचंदन नदीत वाहते करतो.

तर, गुजरातच्या दारु तस्करीवर ब्लॉकबस्टर हिट शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटात पोलिस यंत्रणा रस्त्यांवर कडक नाकाबंदी करुन बंदोबस्त लावते अन्‌ दारुची तस्करी नदीच्या मार्गातून होते. असाच प्रकार जळगावात घडला आहे.

जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी महसूल- पोलिसदल अशी संयुक्त कारवाई करत एका रात्रीत दिड-दोनशे वाळू वाहतुक करणारे डंपर-ट्रॅक्टर जप्त करुन रेकॉर्ड केला. आतातरी वाळू वाहतूक पूर्णतः थांबेल. पण, वाळू माफियांनीही लावलीच शक्कल.. तराफ्यांवरुन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाळूची वाहतूक सुरु झाल्याचे आज तालूका पोलिसांना आढळून आले आहे.

Sand theft on rafts in girna river jalgaon crime news
Nagpur Crime : अल्पवयीन मुलांमध्ये भडकले टोळीयुद्ध एका युवकाचा हत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com