Jalgaon News : परवानगीशिवाय मोबाईल, लॅपटॉप वापरणे म्हणजे हॅकिंग : संदिप गादिया

Sandeep Gadia, cyber crime investigation expert from Pune speaking in autumn lecture series.
Sandeep Gadia, cyber crime investigation expert from Pune speaking in autumn lecture series. esakal

Jalgaon News : जी व्यक्ती दुसऱ्याचा मोबाईल वापरत असते, तिच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. हा प्रकार हॅकिंगमध्ये मोडतो.

एखाद्याच्या परवानगीशिवाय मोबाईल, लॅपटॉप व वापरणे म्हणजे हॅकिंग होत असते, अशी सायबर क्राईमविषयी चिकित्सक माहिती संदीप गादिया मांडली.()

येथील नगरवाचन मंदिर आयोजित ५४ व्या शारदीय व्याख्यानमालेचे पहिले पुष्प पुणे येथील सायबर क्राईम इन्व्हेशस्टिगेशन तज्ज्ञ संदिप गादिया यांनी 'सायबर क्राईम सायबर सुरक्षा' या विषयावर गुंफले. स्लाईड आणि प्रोजेक्टरच्या सहाय्याने सायबर क्राईमविषयी विस्तृत, अशी माहिती संदीप गादिया यांनी श्रोत्यांसमोर मांडली.

व्याख्यानाला विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांचीही उपस्थिती होती. व्यासपीठावर या वाचनालयाचे अध्यक्ष आशिष गुजराथी, उपाध्यक्ष एस. टी. कुलकर्णी, डॉ. परेश टिल्लू उपस्थित होते.

श्री. गादिया पुढे म्हणाले, की माणसाच्या प्रत्येक टॅक्टीज या मोबाईलला माहिती असतात. सायबर क्राईम हा टेक्नॉलॉजीद्वारे केला जातो. मोबाईलचा उपयोग करून हा क्राईम होऊ शकतो. जीपीएस, गुगल मॅप, मोबाईलमधील ॲपद्वारे सायबर क्राईम होऊ शकतो. सायबर क्राईम कोणाबरोबरही होऊ शकतो.

सोशल मीडिया वापरत असाल तरी तुमच्या सोबत सायबर क्राईम होऊ शकतो. ज्याच्याकडे डॉक्युमेंटरी काहीच नसताना अशा व्यक्तीसोबत होऊ शकतो. तुम्ही टेक्नॉलॉजी वापरत असाल किंवा नसाल तरी तुमच्यावर होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

Sandeep Gadia, cyber crime investigation expert from Pune speaking in autumn lecture series.
Jalgaon News: गाय, वासरासह आता अहिंसातीर्थात उंटांची सेवा; कत्तलीसाठी जाणाऱ्या 13 उंटांना आश्रय

स्वातंत्र्यपूर्व काळातील नगरवाचन मंदिर तालुका वाचनालयात ३३ हजार ग्रंथ संपदा आहे. दोन हजार व्याख्याने संदीप गादिया यांनी केले आहेत. कार्यवाह गोविंद गुजराथी यांनी प्रास्ताविक केले. वक्त्यांचा परिचय सहकार्यवाह डॉ. परेश टिल्लू यांनी करून दिला.

वक्त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच व्याख्यानाचे प्रायोजक बाबूभाई गुजराथी यांच्या स्मरणार्थ माजी नगराध्यक्ष रमणलाल गुजराथी यांनी प्रायोजकत्व स्वीकारल्याने यांच्या वतीने त्यांच्या स्नूषा आणि स्व. चिरंजीलाल शर्मा यांच्या स्मरणार्थ व्याख्यानाचे प्रायोजकत्व घेतल्याने राजू शर्मा यांचे स्वागत संदिप गादिया यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचलन गोविंद गुजराथी यांनी केले.

गोपनीय माहिती ‘लीक’ होण्याचा धोका

स्वत:च्या खर्चाने खिशात ठेवलेला डिटेक्टिव म्हणजे मोबाईल आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरत असतात त्याद्वारे सायबर क्राईम करणाऱ्यांना बरीच माहिती असते. गुगलला तर मोबाईल वापरणाऱ्यांची खूपच माहिती असते.

मोबाईलमधील ॲप्सच्या माध्यमातून आपण दिवसभर जे बोलतो किंवा आपल्या परिसरात जे बोलले जाते, त्यातून काही शब्द कॅच करून जाहिराती आपल्या मोबाईल स्क्रीनवर दिसतात. गोपनीय माहितीही आपल्याकडूनच मोबाईलद्वारे लीक होत असते. आपण असंख्य डिजिटल फूट प्रिंट मोबाईलद्वारे तयार करीत असतो, असे गादिया यांनी सांगितले.

Sandeep Gadia, cyber crime investigation expert from Pune speaking in autumn lecture series.
Jalgaon News: शवविच्छेदन न करताच मृतदेह घेऊन गेले कुटुंबीय; दुसऱ्या दिवशीही पोलिस अनभिज्ञच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com