Jalgaon Summer Heat
sakal
जळगाव - एप्रिल महिना संपत आला असतानाच उष्णतेने विक्रमी पातळी गाठली असून, नागरिक हैराण झाले आहेत. यंदा उन्हाळ्याची तीव्रता नेहमीपेक्षा अधिक जाणवत असून, तापमानाने ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे ‘मे’पूर्वीच उकाड्याने कहर केला आहे. जणूकाही सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव जळगावकरांना येऊ लागला आहे.