Jalgaon News : विभागीय जिल्हास्तरीय महोत्सवात कान्ह ललित केंद्राची ‘गगनभरारी’; राज्यस्तरावर निवड

Faculty members along with Kanh Lalit Kendra's team won the title in the regional district level youth festival.
Faculty members along with Kanh Lalit Kendra's team won the title in the regional district level youth festival.esakal
Updated on

Jalgaon News : जिल्हा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र, पुणेतर्फे जिल्हास्तर युवा महोत्सवात केसीई सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्राने नाशिक येथील विभागीय महोत्सवात नऊ बक्षिसांसह विजेतेपद पटकावले. आता या संघाची पुणे येथे राज्यस्तरावर निवड झाली आहे.

कान्ह ललित कला केंद्र नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.(Selection of Kanh Lalit Kendra at state level in divisional district level festival jalgaon news)

दर वर्षी जिल्हा क्रीडा विभागातर्फे सांस्कृतिक महोत्सव भरविण्यात येतो. जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर हा महोत्सव होत असतो. त्यानुसार आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी यासंदर्भात युवा महोत्सव घेण्याचे सूचित केले होते.

तृणधान्य वर्षाची ‘थीम’

संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केल्याने राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर व सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिली होती.

त्यावर हा नाशिक येथील विभागीय महोत्सव पार पडला. त्यानुसार या स्पर्धा सुरू असून, यात प्राथमिक, विभागीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर युवकांना आपली कला दाखवण्याचा आणि त्यात पारंगत होण्याचा बहुमान मिळत असतो.

कान्ह ललित केंद्राची बाजी

यात आता कान्ह ललित कला केंद्राने बाजी मारली असून, पुढील २० डिसेंबरला होणाऱ्या राज्यस्तरीयसाठी हा चमू सज्ज झाला आहे. विद्यार्थ्यांना प्रा. मिलन भामरे, प्रा. पीयूष बडगुजर, दिनेश माळी, अजय शिंदे, प्रा. देवेंद्र गुरव, प्रसाद कासार, प्रा. कपिल शिंगाने, प्रसाद कासार आणि प्रा. वैभव मावळे यांनी मार्गदर्शन केले.

Faculty members along with Kanh Lalit Kendra's team won the title in the regional district level youth festival.
Jalgaon News : एरंडोल-पारोळा मतदारसंघासाठी 40 कोटींचा निधी; रस्ते, पुलांची कामे होणार

या कलाप्रकारात मिळाली बक्षिसे

एकांकिका- प्रथम, समूह नृत्य- प्रथम, रांगोळी- प्रथम, पोस्टर- प्रथम आणि द्वितीय, समूह लोकगीत गायन- तृतीय, लोकनृत्य (एकल)- द्वितीय, फोटोग्राफी- द्वितीय.

''कान्ह ललित कला केंद्र हे नेहमीच विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी कार्य करत असते. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे जेवढे कौतुक करावे, तेवढे कमीच आहे.''- शशिकांत वडोदकर, सांस्कृतिक समन्वयक, केसीई

''विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावर मिळवलेल्या यशाने भारावून न जाता राज्यस्तरावर नाशिक विभागाचा आणि कान्ह ललित कला केंद्राचा डंका कसा गाजवता येईल, याबाबत रणनीती सुरू आहे.''- प्रा. प्रसाद देसाई, संचालक, कान्ह ललित कला केंद्र

Faculty members along with Kanh Lalit Kendra's team won the title in the regional district level youth festival.
Jalgaon News: मंगल कार्यालयात बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे फलक लावा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com