वर्षभरात सात रेशन दुकानांचा परवाना रद्द, ४३ निलंबित

पुरवठा विभागाची कारवाई, पावणेनऊ लाखांचा दंड वसूल
Ration card
Ration cardSakal
Updated on

जळगाव - रेशन कार्डधारकांना कमी धान्य देणे, पावती न देणे, धान्य साठ्यात तफावत असणे, वेळेत दुकान न उघडे ठेवणे आदी गंभीर कारणांमुळे जिल्हापुरवठा विभागाने वर्षभरात सात रेशन दुकानांचा परवाना कायमचा रद्द केला आहे. तर ४३ दुकाने निलंबित केली आहेत. दुकानांमधील दोषांसाठी त्यांना एकूण ८ लाख ८१ हजार १३७ एवढ्या दंडाची आकारणी करण्यात आली आहे.

अनेक रेशन दुकानदारांना रेशन मिळत नाही. अनेकांना कमी रेशन मिळते, पावती मिळत नाही. काही रेशन दुकानदार वेळेवर दुकाने उघडत नाहीत. केव्हाही सूरू करतात व बंद करतात. याची तक्रार जर रेशन कार्डधारकांनी पुरवठा विभागाकडे केली, त्याच दुकानाबाबत अनेक तक्रारी आल्या तर पुरवठा विभाग त्या दुकानावर अचानक छापा टाकतो. त्यात धान्य तपासणी करतो, महिनाभरात आलेले धान्य, वितरित धान्य याचे गणित जुळले नाही तर त्या दुकानदारांवर कारवाई होते. कारवाई करताना गंभीर दोष व सौम्य दोष लक्षात घेऊन दुकान रद्द किंवा निलंबितची कारवाई होते.

जिल्ह्यात रेशन दुकाने

१ हजार ९५४

अंत्योदय कार्ड

१ लाख ३२ हजार २७९

अंत्योदय युनिट

६ लाख ९ हजार १४२

प्राधान्य कुटुंब कार्डधारक

४ लाख ७६ हजार ९७७

प्राधान्य युनिट

२१ लाख ८७ हजार १२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com