जळगाव : सात वर्षांत हवामानात अपरिवर्तनीय बदल

कार्बन उत्सर्जनाचा परिणाम; ऊर्जा साक्षरतेसाठी यात्रा
जळगाव : सात वर्षांत हवामानात अपरिवर्तनीय बदल
जळगाव : सात वर्षांत हवामानात अपरिवर्तनीय बदलsakal

जळगाव : सध्या जगभरात सुरू असलेल्या कार्बन उत्सर्जनामुळे पृथ्वीच्या तापमानात १.१ अंश सेल्सिअस एवढी वाढ झाली आहे, उत्सर्जनाचे हेच प्रमाण कायम राहिले तर येत्या सात वर्षांत तापमान १.५ अंशांपर्यंत वाढेल.. या टप्प्यावर हवामानातील बदल अपरिवर्तनीय होईल, असे मत आयआयटी, मुंबईचे प्रा. चेतनसिंग सोलंकी यांनी व्यक्त केले.

पारंपरिक ऊर्जेऐवजी सर्वांनी सौरऊर्जेचा अधिक वापर केला पाहिजे, त्यासाठी प्रा. सोलंकी यांनी देशभरात ‘एनर्जी स्वराज’ यात्रेस सुरवात केली असून, ही यात्रा जळगावी पोचली. त्यानिमित्त प्रा. सोलंकी यांनी कांताई सभागृहात माध्यमांशी संवाद साधला. या वेळी जैन इरिगेशनच्या सौरऊर्जा प्रकल्पातील सहकारी डॉ. जन्मेजय नेमाडे उपस्थित होते.

जळगाव : सात वर्षांत हवामानात अपरिवर्तनीय बदल
China Corona: चीनमध्ये पाच लाख लोकांचे क्वारंटाइन

प्रतिमाह, प्रतिकुटुंब ४०० किलो कार्बन

प्रा. सोलंकी म्हणाले, प्रत्येक घरातून प्रतिमाह सरासरी ४० किलो कचरा निघतो. मात्र आपण जी उपकरणे, वाहने वापरतो त्यातून दरमहा ४०० किलो कार्बन उत्सर्जन करत असतो आणि हा कार्बन वातावरणात दोन-तीनशे वर्षांपर्यंत टिकून राहतो.

सेकंदाला १३ लाख किलो कार्बन उत्सर्जन

जगाचा विचार केला तर सद्यःस्थितीत प्रतिसेकंद १३ लाख किलो कार्बन उत्सर्जित होऊन वातावरण दूषित करतोय. त्यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान १.१ अंशाने वाढले असून, हेच प्रमाण कायम राहिले तर ते येत्या सात वर्षांत १.५ अंशांनी वाढून हवामान बदल अपरिवर्तनीय टप्प्यावर पोचेल. आता हवामान बदलामुळे दुष्काळ, कुठे महापूर, वादळे, जंगलातील वणवे, हिमशिखरांचे वितळणे, समुद्राची पातळी वाढणे अशा नैसर्गिक आपत्ती येत असून, त्यात प्रचंड वाढ होईल, असा इशारा प्रा. सोलंकी यांनी दिला.

जळगाव : सात वर्षांत हवामानात अपरिवर्तनीय बदल
औरंगाबाद : कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येस मंत्री परब जबाबदार

ऊर्जा साक्षरतेसाठी प्रयत्न

त्यावर जगभरातील देश उपाययोजना करीत आहेत. मात्र, जोपर्यंत प्रत्येक नागरिक ऊर्ज साक्षर होत नाही, हे अभियान चळवळ बनत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही, असे सांगताना प्रा. सोलंकी म्हणाले, त्याच उद्देशाने नोव्हेंबर २०२० पासून मध्य प्रदेशातील भोपाळ येथून ‘एनर्जी स्वराज’ यात्रा सुरू केली. २०३०पर्यंत देशभरातील विविध भागातून प्रवास करत आम्ही त्याबाबत जनजागृती करणार आहोत. विशेषतः तरुणांपर्यंत पोचून पुढची पिढी कार्बन उत्सर्जनापासून सुरक्षित कशी करता येईल, त्यावर काम सुरू असल्याचे ते म्हणाले.

कोण आहेत प्रा. सोलंकी?

प्रा. सोलंकी मुंबईतील आयआयटीचे प्राध्यापक असून, त्यांची ऊर्जाबचत, सौरऊर्जा विषयात पीएच.डी. झाली आहे. सातपेक्षा अधिक पुस्तके लिहिली असून, शंभरावर शोधप्रबंधांचे त्यांनी सादरीकरण केले आहे. जगभरातील ३० देशांत प्रवास करून त्यांनी या विषयात काम सुरू केले. मध्य प्रदेश सरकारच्या सौरऊर्जा जागृती अभियानाचे ते ब्रॅन्ड ॲम्बेसेडर आहेत. ‘एनर्जी स्वराज’ यात्रेच्या माध्यमातून ते एक कोटी लोकांना ऊर्जा साक्षर करणार असून, १०० कोटी लोकांपर्यंत पोचून त्यांचे प्रबोधन करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com