temperature
sakal
जळगाव - जिल्ह्यात तापमानाचा पारा गेल्या चार दिवसांपासून ४५ अंशांच्या वर गेला असून, उन्हाची तीव्रता कायम आहे. जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून, उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.