

Shahada Bribery Case
esakal
शहादा: वनपरिक्षेत्रात १७ हजार रुपयांच्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सव्वादोन महिन्यांनंतर पुन्हा मोठी कारवाई केली आहे. जयनगर बीटचे वनपाल संजय पवार यांना सोमवारी (ता. १७) रात्री शहादा बसस्थानक परिसरातून अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणी आणखी एका वन कर्मचाऱ्याला अटक झाल्याने लाच प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.