Jalgaon News : मोबाईलच्या अतिरेकामुळे कुटुंब व्यवस्था मोडकळीस: शरद सोनवणे

Amalner: In a program organized by Gujarati Mahila Mandal, dignitaries and women's mandal were present while taking oath of Digital Detox awareness campaign
Amalner: In a program organized by Gujarati Mahila Mandal, dignitaries and women's mandal were present while taking oath of Digital Detox awareness campaignesakal

अमळनेर : मोबाईलचा अतिरेक झाल्याने अनेक ठिकाणी लग्न आणि कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली असून, कुटुंबातील संवाद व संपर्क संपत चालला आहे. जुळलेली लग्न केवळ मोबाईलमुळे तुटत आहे. यामुळे मोबाईलचा वापर कमीतकमी करून ऑफलाइन संपर्क वाढवला पाहिजे, असे मार्गदर्शन अमळनेर येथील शरद सोनवणे यांनी केले.

‘डिजिटल डिटॉक्स’ विषयावर गुजराथी महिला मंडळाच्यावतीने डिजिटल डिटॉक्सच्या उत्तर महाराष्ट्र राजदूत राजश्री पाटील यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शरद सोनवणे, आयटी प्रोफेशनल वरद इन्फोटेक कॉम्प्युटरच्या संचालिका संध्या लोहार मार्गदर्शन उपस्थित होते. या वेळी शरद सोनवणे यांनी ऑफलाइन येण्याबद्दल सर्वांचे प्रबोधन केले. (Sharad Sonawane say Due to excess of mobile phones, family system is broken Guidance on Digital Detox in Gujarati Mahila Mandal Jalgaon News)

Amalner: In a program organized by Gujarati Mahila Mandal, dignitaries and women's mandal were present while taking oath of Digital Detox awareness campaign
Jalgaon News : रस्त्यांवर कोटिंगचा लेअर टाका; महामार्ग विभाग मक्तेदारांना कळविणार

संध्या लोहार यांनी महिलांशी संवाद साधताना डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय? ‘स्मार्ट गॅजेट्स स्मार्टीचा वापर? डिजिटल डिटॉक्स महत्त्वाचे का आहे? हे तुमची उत्पादकता, झोप, आरोग्य सुधारते आणि तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करते. विषारी सामग्रीऐवजी आरोग्यदायी सामग्रीचे सेवन करा आणि त्यात सामील व्हा, असे आवाहन केले. तसेच ‘ऑफलाईन इज द न्यू लक्झरी’ हे ब्रीदवाक्य त्यांनी सर्वांना दिले.

दरम्यान, डिजिटल डिटॉक्स म्हणजेच (डबल्यूडी डीडी) एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जी डिजिटल नैतिकता, डिजिटल शिष्टाचार, डिजिटल शिक्षण, डिजिटल फॉस्टिंग आणि मानव जीवनात सुसंवाद निर्माण करण्यासाठी काम करते. गुजराथी महिला मंडळात डिजिटल डिटॉक्सच्या जनजागृती मोहिमेच्या मिशनला सर्व महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला.

हेही वाचा: प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Amalner: In a program organized by Gujarati Mahila Mandal, dignitaries and women's mandal were present while taking oath of Digital Detox awareness campaign
Municipal Corporation News : ‘अमृत 2.0 ’ योजनेतून जळगावला वगळले

या वेळी गुजराथी मंडळाच्या संचालिका सुनंदाबेन गुजराथी व उपाध्यक्षा लता प्रेम शाह यांनी राजश्री पाटील तसेच शरद सोनवणे व संध्या लोहार यांचा सत्कार केला. कार्यशाळेचे नियोजन मंडळाच्या अध्यक्षा भाविका जीवनांनी यांनी केले होते. त्यांना मंडळाच्या कार्यकारी सदस्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन डॉ. मंजुश्री जैन यांनी केले. या वेळी सर्वांनी दैनंदिन जीवनात डिजिटल डिटॉक्स घेण्याची शपथ घेतली.

तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर घातक : राजश्री पाटील

‘डिजिटल डिटॉक्स’च्या राजदूत राजश्री पाटील यांनी मोबाईल सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर, यामुळे कुटुंबातील आणि समाजातील सर्वांत मोठी समस्या निर्माण होत आहे, तसेच तरुण पिढीसाठी मोठा दुष्परिणाम दिसून येत आहे.

या साठी तंत्रज्ञान आणि मानवी जीवन यांच्यातील समतोल जीवनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी काय केले जाऊ शकते? यावर आपण हे कसे नियंत्रित करू शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी जागतिक डिजिटल डिटॉक्स डे फाउंडेशननेच्यावतीने उपस्थिताना दिली. तसेच मानवी जीवन आणि तंत्रज्ञान यामध्ये चालत असलेल्या समस्येवर अवेरनेस करून त्यावर उपाय देखील सांगत टर्नऑफ होऊन ट्यूनइन का करायचे हे समजावून सांगितले.

Amalner: In a program organized by Gujarati Mahila Mandal, dignitaries and women's mandal were present while taking oath of Digital Detox awareness campaign
Municipal Corporation News : ‘अमृत 2.0 ’ योजनेतून जळगावला वगळले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com