शिव भोजन थाली केंद्राची चौकशी करा !

शिव भोजन थाली केंद्राची चौकशी करा !
Updated on

यावल : शासनाने सर्वसामान्यांना पोटभर जेवण मिळावे या दृष्टीकोणातुन सुरु केलेली शिव भोजन थाली योजना येथे तक्रारीच्या फेऱ्यात अडकली आहे. ज्या बचत गटाला ठेका दिला आहे त्याची सविस्तर चौकशी व्हावी अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.  या पत्राची प्रत नुकतीच निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांना देण्यात आली.

येथील शिवसेनेच्या महीला आघाडीच्या पदाधिकारी सपना घाडगे यांनी आ.चंद्रकांत पाटील यांचेकडे केलेल्या तक्रारीनुसार सदरचे शिव भोजन थाली केन्द्र निमबह्याय असल्याचे पुरावे दिले आहेत. शिवशक्ती महीला बचत गटास शिव भोजन थाली केंद्र देण्यात आले आहे. शिव भोजन थाली केन्द्र प्रकरणात शासनाच्या योजनांचा दुरुपयोग करीत असल्याचे दिसुन येत असुन या प्रकरणी तत्काळ चौकशी करून उचित कारवाई करावी अशा मागणीचे पत्र मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे दिले.

तहसीलदारांना देकील दिले निवेदन

याबाबत एक पत्र शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील यांना देण्यात आले आहे. या पत्राची प्रत जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांना दिली. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवीन्द्र सोनवणे , पंचायत समितीचे माजी सभापती सुर्यभान तायडे , सेनेचे माजी तालुका प्रमुख कडु पाटील , विजयसिंग पाटील , शरद कोळी ,आदीवासी सेनेचे तालुका अध्यक्ष हुसैन तडवी,पप्पु जोशी , संतोष खर्चे , अजहर खाटीक , मोहसीन खान, सपना घाडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.  

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com