धरणगावात शिवसेनेतर्फे पेट्रोल डिझेल दरवाढीचा विरोधात तीव्र आंदोलन

धरणगावात शिवसेनेतर्फे पेट्रोल डिझेल दरवाढीचा विरोधात तीव्र आंदोलन

धरणगाव : येथे केंद्र सरकारने वाढवलेल्या इंधन दरवाढीचा विरोधात मोर्चा काढण्यात आला  तहसील कार्यालयात तहसीलदार नितीन कुमार देवरे यांना निवेदन देण्यात आले मोर्चात यावेळी शिवसैनिक यांनी शासनाच्या निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या.

वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू मेहेगा तेल, चाले जावा चले जावं मोदी सरकार चले जावं, आबाकी बार पेट्रोल 100के पार, पेट्रोल दरवाढ करणाऱ्या भाजपा सरकारचा जाहीर निषेध, रामाचा भरतात पेट्रोल 95, तर रावणाचा लंकेत पेट्रोल 51 आशा विविध घोषणा देऊन केंद्र सरकारच्या निषेध नोंदवला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी देशात कच्या तेलाचे भाव कमी असून पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहे. शेतकऱ्यांना दळण वळणासाठी पेट्रोलची आवश्यकता असते शेतकऱ्यांचा थट्टा करण्याऱ्या केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

आंदोलनात यांची होती उपस्थिती..

यावेळी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील प स सभापती मुकुंद ननावरे उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील शहर प्रमुख राजेंद्र महाजन गटनेते विनय भावे युवा सेना उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ प्रभारी नगराध्यक्ष कल्पना महाजन, माजी नगराध्यक्ष उषा वाघ प्रतिभा संजय चौधरी, नगरसेविका उजवला परेराव अंजली विसावे, कीर्ती मराठे आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन- भूषण श्रीखंडे
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com