Jalgaon News : साठ ब्रास अवैध वाळूसाठा पुन्हा जप्त; जिल्हाधिकारी उतरले कारवाईला

Sand Transport
Sand Transportesakal
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यात १० जूनपासून वाळूउपसा बंद आहे. असे असताना वाळूमाफिया लपवून ठेवलेल्या वाळूसाठ्यावरून वाळूउपसा करताना दिसतात.

त्यामुळे जिल्हाधिकारी अमन मित्तल, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी आता लपवून ठेवलेल्या वाळूसाठ्यांवर आपली करडी नजर ठेवली आहे.

सोमवारी (ता. १९) रात्री तहसीलदार नामदेव पाटील व टीमने आव्हाणे, असोदा आदी ठिकाणी झाडाझुडपांत लपवून ठेवलेला सुमारे ६० ते ७० ब्रास वाळूसाठा शोधून जप्त केला आहे.(Sixty brass illegal sand reserves seized again Additional Collector took action Operation by using mobile battery in dark Jalgaon News)

विशेष म्हणजे, अपर जिल्हाधिकारी महाजन स्वतः कारवाईसाठी उतरले होते. रात्री अंधारात बॅटरी, वाहनांच्या प्रकाशात ही कारवाई केली.

जप्त केलेली वाळू जिल्हा प्रशासकीय इमारतीत आणण्याचे काम मंगळवारी (ता. २०) दिवसभर महसूल विभागाने केले आहे.

जिल्ह्यातील वाळू ठेक्याची मुदत संपल्याने वाळू चोरीमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, राज्य शासनाने वाळूचे नवीन धोरण जाहीर केले असून, डेपो पद्धत अमलात आणली आहे. मात्र, डेपो पद्धतीच्या लिलावाकडेही एजन्सींनी पाठ फिरविल्याने यंदा वाळू घाटांचे लिलाव होऊ शकले नाहीत. याचाच फायदा वाळूमाफिया घेत असून, सर्रासपणे वाळूची चोरटी वाहतूक सुरू होती.

वाळूउपसा बंद असतानाही जिल्ह्यात वाळूउपसा सुरू असून, नागरिकांना जास्त दराने वाळू उपलब्ध होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला आहे. यामुळे अवैध वाळूउपसा थांबविण्यासाठी विविध उपाययोजना महसूल यंत्रणेच्या माध्यमातून ते करीत आहेत. आतापर्यंत दोन वेळा वाळूमाफियांनी केलेला अवैध वाळूसाठा जप्त करून माफियांचे वाळूचोरीचे स्वप्न भंग केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sand Transport
Jalgaon News : रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकींवर कारवाई

गेल्या सात दिवसांपूर्वी आव्हाणे शिवारातील गिरणा नदीपात्रात सायंकाळी वाळू भरणारे सात डंपर आणि पाच ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने ताब्यात घेतले होते. यातील पाच ट्रॅक्टर विनाक्रमांकाचे होते. डंपर व ट्रक्टरमालकांचा शोध आरटीओ विभाग घेत आहे.

८ जूनला गिरणा नदीपात्रातून वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रातांधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, महसूल व पोलिसांनी मौजे खेडी खुर्द (ता. जळगाव) येथील गिरणा नदीपात्रातून अवैध उत्खनन केलेला २०० ब्रास वाळूचा साठा जप्त केला होता.

१५ दिवसांपूर्वीही बांभोरी येथील गिरणा नदीकाठावरील झुडपांमध्ये लपविलेला अंदाजे ४० ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे.

"आव्हाणे शिवारात अवैध लपवून ठेवलेला वाळूसाठा जप्त केला आहे. रात्री दहा ते साडेदहादरम्यान अंधारात ही कारवाई केली. वाहनांच्या प्रकाशात हा साठा जप्त केला. मंगळवारी दिवसभर जप्त वाळूची वाहतूक सुरू होती."

-प्रवीण महाजन, अपर जिल्हाधिकारी

Sand Transport
Jalgaon MIDC News : एमआयडीसीच्या घोडचुकीचा उद्योजकांना भुर्दंड; उद्योजक संतप्त...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com