‘एक दिवस महाराजांसाठी’ मग काय..किल्ला झाला चकाचक! 

‘एक दिवस महाराजांसाठी’ मग काय..किल्ला झाला चकाचक! 
Updated on

यावल  : आजचा युवक दिशाहीन, भरकटलेला, व्यसनी झाल्याचे आपण ज्येष्ठ मंडळींकडून नेहमीच ऐकत असतो. मात्र, या विचारांना छेद देत समाजोपयोगी कार्य करून भरकटलेल्या युवकांसह समाजासमोर आदर्श निर्माण करण्याचे कार्य येथील काही शिवभक्त तरुणांनी गुरुवारी येथे केले. येथे शहरात न्यायालयाच्या बाजूला व हरिता, सरिता नदीच्या संगमावर असलेल्या सरदार निंबाळकरांच्या ऐतिहासिक किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्याचा प्रयत्न केला आहे.
 

यावल शहरासह परिसराची ऐतिहासिक ओळख असलेल्या सरदार निंबाळकरांच्या किल्ल्याची खूपच पडझड होऊन दुरवस्था झाली आहे. या किल्ल्याकडे स्थानिक प्रशासनासह पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळेच या किल्ल्यावर चोहोबाजूंनी काटेरी झुडपे वाढून तेथे पर्यटकांऐवजी गुराढोरांसह जनावरांचा वावर वाढला आहे. परिणामी, काही नागरिक किल्ल्यावर प्रातर्विधीसाठीही वापर करतात. ही दुर्दशा पाहून येथील शहरातील शिवभक्तांना चीड यायची. त्यामुळे छ्त्रपती शिवजयंतीनिमित्त काही शिवभक्त एकत्र आले.

त्यांनी ‘एक दिवस महाराजांसाठी’ या योजनेचा प्रारंभ करीत ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी साफसफाई करण्याची योजना हाती घेऊन ती सकाळी साडेसहा ते दुपारी एकपर्यंत सुमारे सहा तास तेथे राबून स्वच्छता मोहीम राबवून काटेरी झुडपे काढण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेंतर्गत अवघ्या सहा वर्षांच्या मुलासह अंदाजे २० ते २२ तरुण सर्व शिवभक्तांनी एक दिवस महाराजांच्या सेवेसाठी देण्याचा निर्धार केला. कुदळ, कुऱ्हाड, फावडे, घमेली, विळा सर्व सामग्री घेऊन शिवभक्त सेनेने स्वच्छता मोहिमेसाठी किल्ला सर केला. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon railway flyover latest update
Israeli Farming Techniques Empower Women Farmers in Maharashtra's Varakhedi Village
Tension in Pimpalner as Maternal Death Leads to Protest Against Doctors
Dhule cyclists complete Pandharpur cycle wari
Marathi News Esakal
www.esakal.com