

जळगाव - औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या घटस्फोटीत महिलेची बहिणीचा वर्गमित्र असलेल्या सेना जवानाशी ओळख झाली. ओळखीतून प्रेम आणि लग्नाचे आश्वासन देत पीडितेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी इंडो तिबेटीयन सीमेवर असलेला जवान संशयित सोमनाथ सुरेश गोपाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.