Jalgaon News : ‘विनोद पाटील अमर रहे...’च्या घोषणांनी परिसर दणाणला; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

The last rites of martyred jawan Vinod Shinde at Rotwad in Dharangaon taluka were held on Sunday, a photograph on the occasion.
The last rites of martyred jawan Vinod Shinde at Rotwad in Dharangaon taluka were held on Sunday, a photograph on the occasion.esakal

Jalgaon News : ‘अमर रहे अमर रहे... वीर जवान विनोद पाटील अमर रहे...’च्या घोषात रविवारी (ता. १९) सकाळी रोटवद (ता. धरणगाव) येथे वीर जवान विनोद शिंदे-पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जवान विनोद पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात आला.(soldier Funeral at midst of government jalgaon news)

भारतीय सैन्य दलात अहमदाबाद येथे कर्तव्य बजावत असताना जवान विनोद जवरीलाल शिंदे-पाटील (वय ३९) यांचा शनिवारी (ता. १८) आकस्मिक मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी रोटवद येथे आणण्यात आले.

त्यानंतर सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यानिमित्त ग्रामस्थांनी अंगणात रांगोळ्या रेखाटल्या होत्या. शालेय विद्यार्थी हातात तिरंगा घेऊन ‘अमर रहे.. अमर रहे.. वीर जवान विनोद पाटील अमर रहे’ सह ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’च्या घोषणा देत होते.

The last rites of martyred jawan Vinod Shinde at Rotwad in Dharangaon taluka were held on Sunday, a photograph on the occasion.
Jalgaon News : रोटवद येथील जवान शहीद; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

वीर जवान विनोद पाटील यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, एरंडोलचे प्रांताधिकारी मनीष गायकवाड, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील, रोटवदचे सरपंच सुदर्शन पाटील, पोलिसपाटील नरेंद्र शिंदे आदींनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलिस दलाच्या तुकडीने तीन फैरी झाडत मानवंदना दिली.

सैन्यदल व माजी सैनिकांनीही वीर जवानास अभिवादन केले. वीर जवान पाटील यांचा मुलगा आदित्य यांनी मुखाग्नी दिला. वीर जवान पाटील यांचे कुटुंबीय, सैन्य दलाचे अधिकारी, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक, आप्तेष्ट उपस्थित होते.

The last rites of martyred jawan Vinod Shinde at Rotwad in Dharangaon taluka were held on Sunday, a photograph on the occasion.
Jalgaon News : भारत कुपोषणमुक्त करण्यावर तज्ज्ञांचे विचारमंथन; दोनदिवसीय प्रशिक्षण वर्ग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com