Latest Marathi News | पदवीधरांच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी मतदार नोंदणी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Voter Registration Rules Changes

Adv Zubair Shaikh Statement : पदवीधरांच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी मतदार नोंदणी करा

जळगाव : पदवीधरांच्या संघटित होण्याने व सर्वांची नोंदणी होऊनच पदवीधरांच्या समस्या सुटू शकतात. यामुळे अधिकाधिक पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन मायनॉरिटी राइट फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. जुबेर शेख यांनी मंगळवारी (ता. १) पत्रकार परिषदेत केले. या वेळी जमील शहा, डॉ. रागीब उपस्थित होते.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदारांनी मागील दशकांत जगभरात व देशभरात फोफावत असलेले स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट, औद्योगीकरणरूपी प्रगतीचे वादळ थोपवून धरल्याचे निराशाजनक चित्र नाशिक विभागात पाहायला मिळत आहे. नाशिक विभागातील पदवीधर आमदारांच्या औदासीन्यामुळे, अकार्यक्षमतेमुळे म्हणा या भागातील पदवीधर देशोधडीला लागल्याचे विदारक चित्र सर्वांना उद्विग्न करून सोडत आहे, असा आरोप ॲड. जुबेर शेख यांनी केला.(Statement by the Founder President of Minority Rights Federation Voter registration to solve problems of graduates Jalgaon News)

हेही वाचा: District Milk Union Election : महाविकास आघाडी विरुद्ध भाजप -शिंदेगट युती लढणार

रोजगाराच्या संधीच उपलब्ध नाहीत

ॲड. शेख म्हणाले, की नाशिक विभागात पदवीधरांना नोकऱ्या उपलब्ध नाहीत. उलटपक्षी नोकरीवर असलेले पदवीधर बेरोजगार झालेले आहेत. विविध उद्योग स्थलांतरित झाल्याने किंवा बंद पडल्याने मोठ्या प्रमाणावर नोकरकपातीद्वारे पदवीधर बेरोजगार झालेला आहे. पदवीधरांकरिता शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने अथवा पदवीधर आमदारांनी अकार्यक्षमता दाखविल्याने नवीन उद्योजक तयार झाले नाहीत. त्यांच्याद्वारे नवीन रोजगाराच्या संधी बेरोजगारांना उपलब्ध झाल्या नाहीत. याचसोबत कोरोना कालावधीत जास्त नुकसान उठवणारा व समस्यांनी ग्रस्त असलेला घटक अर्थात पदवीधरच होता.

पदवीधर मतदार नोंदणीसाठी उरले अवघे सहा दिवस

जळगाव ः भारत निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार १ नोव्हेंबर २०२२ या अर्हता तारखेवर आधारित नाशिक पदवीधर मतदारसंघाची यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम ७ नोव्हेंबरपर्यंत सुरू आहे. त्यानुसार पात्र पदवीधर आता नव्याने मतदार नोंदणी करू शकणार आहेत. त्यासाठी केवळ सहा दिवस शिल्लक असल्याने १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी किमान तीन वर्षे आधी पदवी धारण केलेल्या नागरिकांनी, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, बँका, औद्योगिक संस्था इत्यादी कार्यालयांतील पात्र पदवीधर अधिकारी, कर्मचारी यांनी अर्ज क्रमांक १८ भरून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तहसील कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी केले आहे.

हेही वाचा: 'सुषमा अंधारेंच्या नादाला लागू नका, अन्यथा कुंभारावानी चिखलासारखं तुडवल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही'