Stone Pelting At Shirsoli: शिरसोली गावात मिरवणूकीवर दगडफेक; अनेक जण जखमी, परिसरात तणावाचे वातावरण

Stone Pelting At Shirsoli: शिरसोली (ता. जळगाव) येथे गुरुवारी (ता. २८) रात्री मिरवणुकीवर समाजकंटकांनी दगडफेक केली. दगडफेकीत गृहरक्षक दलाच्या जवानासह पाच ग्रामस्थ जखमी झाले.
Stone Pelting At Shirsoli:
Stone Pelting At Shirsoli:
Updated on

Stone Pelting On Shiv Jayanti Procession At Shirsoli: शिरसोली (ता. जळगाव) येथे गुरुवारी (ता. २८) रात्री मिरवणुकीवर समाजकंटकांनी दगडफेक केली. दगडफेकीत गृहरक्षक दलाच्या जवानासह पाच ग्रामस्थ जखमी झाले. एमआयडीसी पोलिसांसह राखीव पोलिस दलाचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. जखमी युवक जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी पाहणी करून पोलिस अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. दरम्यान, रात्रीतून २० ते २५ जणांना ताब्यात घेण्यात आले.

शिरसोली प्र. बो. येथे गुरुवारी सायंकाळी शिरसोली प्र. बो. येथील इंदिरानगर येथून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक निघाली होती. या वेळी तरुणांचा जल्लोष सुरू होता. रात्री सव्वाआठच्या सुमारास मिरवणूक वराड गल्लीतून जात असताना काही काळ ढोल-ताशे बंद केले.

Stone Pelting At Shirsoli:
Madha Lok Sabha: रंगपंचमीपूर्वीच सोलापुरात राजकीय रंगबदली; लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घडामोडींना वेग

त्याचवेळी अचानक समाजकंटकांनी दगडफेक सुरू केली. यात मिरवणुकीतील तरुण जखमी झाले. यात विशाल दिलीप पाटील (वय २५, रा. शिरसोली) मंगेश साहेबराव पाटील (३०), बाळू तुळशीराम पाटील (४५) याच्यासह गृहरक्षक दलाचा जवान पंकज सापकर या दोघांसह इतर पाच-सहा जण जखमी झाले.

जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित आणि दंगा नियंत्रण पथकाने घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

Stone Pelting At Shirsoli:
Madha Lok Sabha: माढ्यासाठी ‘देवगिरी-सागर’वर खलबतं! तिढा सुटणार की मोहिते-पाटील बंडाचे निशाण फडकवणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com