Jalgaon Crime Update : वीजचोरी विरोधात धडक कारवाई; 51 घरांमध्ये आढळली वीजचोरी

Electricity Theft
Electricity Theftesakal

जळगाव : दोन महिन्यांपूर्वी एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात वीजचोरी पकडणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण झाली होती. त्याच गावामध्ये मंगळवारी वीजचोरीविरोधात धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये गावातील सर्व वीज कनेक्शनची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण ५१ घरांमध्ये वीजचोरी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले.

एरंडोल तालुक्यातील जवखेड्यात वीजचोरीविरोधात कारवाई सुरू असताना महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण झाली होती. यामुळे महावितरणकडून पोलिस बंदोबस्तात पुन्‍हा धडक मोहीम राबवून कारवाई करण्यात आली. (Strike action against power Theft Electricity Theft found in 51 house Jalgaon News)

Electricity Theft
Jalgaon : जिल्हा दूध संघाची आजपासून रणधुमाळी

ही मोहीम धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्या नेतृत्वाखाली एरंडोल शहर कक्षाचे सहाय्यक अभियंता पी. एस. महाजन, कासोदा कक्षाचे सहाय्यक अभियंता राहुल पाटील, एरंडोल ग्रामीण कक्षाच्या सहाय्यक अभियंता लक्ष्मी माने, पिंपळकोठा कक्षाचे कनिष्ठ अभियंता इच्छानंद पाटील यांच्यासह सर्व जनमित्र व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

एरिअल बंच केबलही टाकली

मोहिमेत वीजचोरी पकडण्यासोबतच गावातील जुन्या वीजतारा काढून नवीन एरिअल बंच केबल टाकण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. काही भागातील काम झाले असून, उर्वरित काम येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे या गावातील तसेच परिसरातील वीजचोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

Electricity Theft
Campaign for student growth : महापालिका शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचा अहवाल मागविला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com