Crime News Jalgaon : विद्यार्थ्याने केली शाळेच्या आवारातच शिक्षकास मारहाण

Student Assaulted Teacher
Student Assaulted Teacheresakal

पाचोरा : पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील एका माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्याने शिस्तीत राहा, असे सांगणाऱ्या शिक्षकालाच शाळेच्या आवारात मारठोक करण्याची घटना घडली. मारहाण झालेल्या शिक्षकाने पिंपळगाव हरेश्वर पोलिसात तक्रार दिल्यावरून पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्यास ताब्यात घेऊन त्यास समज देऊन अल्पवयीन असल्याने पालकांच्या स्वाधीन केले.

पिंपळगाव हरेश्वर येथील अकरावीत शिकणारा एक विद्यार्थी शुक्रवारी (ता. १४) शर्टची वरील दोन बटन उघडे करून शर्टाच्या कॉलरला झटका देत तोंडात गुटखा चावत हातात लोखंडी चेन फिरवत शाळेच्या आवारात फिरत होता. या वेळी शाळेतील शिक्षकाने त्याला हटकले. जरा शिस्तीत राहा व विद्यार्थ्यासारखा वाग असे सांगितले.(Student assaulted teacher inside school premises Jalgaon Crime News)

Student Assaulted Teacher
Eknath Khadse Statement : सरकार तुमचं आहे, चोरीचा गुन्हा दाखल करून चौकशी करा

त्याचा राग आल्याने विद्यार्थी शिक्षकाच्या अंगावर धावून गेला व शिक्षकाची कॉलर पकडून त्यांना शाळेच्या आवारातच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या गळ्यावर ओरबडले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर जवळच पडलेला लाकडी दांडा उचलून त्याने शिक्षकाच्या उजव्या पायावर व पाठीवर मारला.

अचानक झालेला हा जीवघेणा हल्ला पाहून विद्यार्थ्यांची पळापळ झाली. इतर शिक्षक घटनास्थळी धावत आले व त्यांनी विद्यार्थ्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु विद्यार्थ्याने समजावण्यासाठी आलेल्या शिक्षकांनाही अश्लील शिवीगाळ करत तुम्ही बाहेर भेटा, असे धमकावत पळ काढला.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मारहाण झालेले शिक्षक प्रचंड गोंधळले. इतर शिक्षकही भयभीत झाले. त्यांनी संबंधित शिक्षकांना मानसिक धीर दिला व पोलिसात तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल केला व पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले व त्याला समज देऊन पालकांच्या स्वाधीन केले.

Student Assaulted Teacher
Eknath Khadse Statement : ऐनकेन प्रकारे गुन्ह्यात अडकवून अटक करण्याचे षडयंत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com