esakal | सहा दिवसापासून बेपत्ता तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

बोलून बातमी शोधा

सहा दिवसापासून बेपत्ता तरुणाची गळफास घेवून आत्महत्या }

पदमालाय देवस्थानाकडे येणाऱ्या गालापूर रस्त्यावरील जंगलात एक व्यक्ती झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह दिसला.. 

सहा दिवसापासून बेपत्ता तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
sakal_logo
By
अल्हाद जोशी

एरंडोल : एरंडोल- बोरगाव (ता.धरणगाव) येथील तेवीस वर्षीय युवकाने गालापूर रस्त्यावरील पदमालयाच्या जंगलात गळफास घेवून आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. आत्महत्या केलेल्या युवकाचे प्रेत पूर्णपणे खराब झाले होते.मयत तरुण महाराष्ट्र वीज वितरण कंपनीत रोजंदारीवर कामाने जात असल्याचे समजते.

आवर्जून वाचा- सोलर प्रकल्प पीडित शेतकरी मुंबईत आंदोलन करणार 
 

याबाबत माहिती अशी,कि उमरदे येथील पोलीस पाटील शेखर साहेबराव जगताप हे शेतात काम करीत असतांना त्याना सकाळी पदमालयचे उपसरपंच अर्जुन मोरे यांनी मोबाईल फोन करून पदमालाय देवस्थानाकडे येणाऱ्या गालापूर रस्त्यावरील जंगलात एक व्यक्ती झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याचे सांगितले. पोलीस पाटील शेखर जगताप यांनी पोलिसाना माहिती देऊन घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी एक युवक झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. युवकाचे मृतदेहाची अवस्था अतिशय वाईट होती. 

पोलिस घटनास्थळी

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे,हवालदार संदीप सातपुते,अकिल मुजावर, मिलिंद कुमावत,अनिल पाटील यांचेसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने प्रेत खाली उतरविले. प्रेताच्या खिशात एक पाकीट व मोबाईल आढळून आला. पाकिटातील ओळखपत्रावरून मृत युवकाची ओळख पटली.त्याचे नाव ज्ञानेश्वर कृष्णा चव्हाण (वय-23)रा.बोरगाव (ता.धरणगाव) असल्याचे ओळखपत्रावरून समजले.

आवश्य वाचा- अमळनेर तालुक्यातील ४६ गावांच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अडीच कोटी अनुदान 
 

सहा दिवसापासून बेपत्ता

मयत ज्ञानेश्वर चव्हाण सुमारे सहा दिवसांपासून बेपत्ता होते. त्याच्या पच्छात आई, वडील आणि भाऊ असा परिवार असून आई वडील शेतीकाम करतात तर मोठा भाऊ सैन्यदलात आहे. याबाबत शेखर साहेबराव जगताप यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जुबेर खाटिक तपास करीत आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे