भयंकरच !  मोबाईलमध्ये डेथ क्लाॅक वेबसाइटवर मृत्यु कसा असतो पाहिला; आणि तेरा वर्षिय मुलाने घेतला गळफास

भूषण श्रीखंडे
Tuesday, 26 January 2021

आजी कामानिमित्ताने दुकानवर गेली. दुकानावरून परत आल्यावर बाथरूममध्ये हर्षल हा साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळुन आला

जळगाव ः मुलांमध्ये मोबाईलचा अतिरेक दिवसेंदिवस वाढत जात असून यातून भयंकर घटना घडत आहे. अशीच घटना जळगाव शहरातील तुकामार वाडी येथे घडली. तेरा वर्षीय मुलाने  मोबाईमध्ये डेथ क्लाॅक ही वेबसाइट ओपन करून त्यात जन्म तारीख टाकून आपला कसा मृत्यू होतो हे बघून स्वताःला गळफास लावून घेतल्याची भयंकर घटना घडली. 

 

नातेवाईकांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल उर्फ सोन्या दीपक कुवंर (वय १३) रा. शिंदखेडा ता. धुळे येथील रहिवासी आहे. तो आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने तीन ते चार महिन्यांपासून हर्षल ऊर्फ सोन्या हा तुकाराम वाडीतील त्याचे मामा दिपक भदाणे यांच्याकडे आलेला होता. मामा दिपक यांचा कपडे इस्त्रीचा व्यवसाय आहे.

मामा, आजी घराबाहेर गेला अन..

मामा दिपक कामानिमित्ताने घराबाहेर होते तर हर्षल व त्याची आजी प्रमिलाबाई हे दोघेच घरी होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास आजी कामानिमित्ताने दुकानवर गेली. दुकानावरून परत आल्यावर बाथरूममध्ये हर्षल हा साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळुन आला.तुकाराम वाडीतील ग्रामस्थांसह नातेवाईकांनी मृतदेह तातडीने सुरुवातीला खाजगी रुग्णालयात यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविला. या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले.  पंचनामा करुन शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

 

मोबाईलमध्ये डेथ क्लाॅक वेबसाईट ओपन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षल याच्याकडे मोबाइल होता. या मोबाईलमध्ये त्याने डेथ क्लाॅक ही वेबसाइट ओपन करून याठिकाणी मृत्यू कधी होणार म्हणून स्वतःची जन्मतारीख टाकलेली असल्याचे दिसून आले. तसेच यानंतरही त्याने यू ट्यूबसह अनेक वेबसाइट ओपन केल्याचे दिसून आले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: subside marathi news jalgaon thirteen year old boy committed suicide strangulation