Jalgaon : जोशीपेठेतील इस्टेट एजंटची आत्महत्या | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Haji Aklak Khatik

Jalgaon : जोशीपेठेतील इस्टेट एजंटची आत्महत्या

जळगाव : शहरातील जोशी पेठेतील बागवान गल्लीतील अखलाक अब्दुल खाटीक (वय ५२) यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. १) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Suicide of an estate agent in Joshipeth Jalgaon Latest Marathi News)

हेही वाचा: जिद्द : मंडप व्यवसायातून कुटुंबासाठी उभ्या राहिल्या सुरेखाताई

शहरातील जोशीपेठेतील बागवान गल्लीत अखलाक खाटीक हे वास्तव्यास होते. ते प्लॉट खरेदी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सोमवारी सकाळी दहा वाजेपूर्वी त्यांनी घरात गळफास घेत आत्महत्या केली.

हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करीत त्यांना मयत घोषित केले. खाटीक यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: Zarif Baba Murder Case : SITकडून चौकशी; 5वा संशयित अद्यापही फरार

Web Title: Suicide Of An Estate Agent In Joshipeth Jalgaon Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..