road empty by summer heat
sakal
जळगाव - सर्वाधिक तापमानाचे शहर म्हणून जळगावची ओळख आहे. जळगावात सध्या सूर्य आग ओकत आहे. केवळ दिवसाच नव्हे, तर आता रात्रीच्याही तापमानात सरासरीपेक्षा मोठी वाढ झाल्याने जळगावकर हैराण झाले आहेत. दिवसाच्या उष्णतेनंतर शरीर थंड होण्यासाठी व झीज भरून निघण्यासाठी रात्रीचा गारवा आवश्यक असतो. मात्र ‘उबदार’ रात्रमुळे शरीराची ‘रिकव्हरी’ प्रक्रिया मंदावली आहे. याचे गंभीर परिणाम मानवी आरोग्य व पर्यावरणावर होताना दिसत आहेत. त्यामुळे अशा वातावरणात काळजी घेणे गरजेचे आहे.