Summer Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट; पारा ४२ अंशांवर, सकाळपासूनच उन्‍हाच्‍या झळा; रात्रीच्‍या उकाड्यातही वाढ

गेल्या तीन दिवसांपासून तापमानात सातत्‍याने वाढ होत आहे. यामुळे जळगाव शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा तीव्र झाला आहे.
Summer Heatwave in Jalgaon

Summer Heatwave in Jalgaon

sakal

Updated on

जळगाव - गेल्या तीन दिवसांपासून तापमानात सातत्‍याने वाढ होत आहे. यामुळे जळगाव शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा तीव्र झाला आहे. एप्रिलचा पहिला आठवडा थंड राहिल्‍यानंतर दुसऱ्या आठवड्यात उन्हाचा चटका अधिक तीव्र झाला आहे. यामुळे उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असून, तापमानाने ४२ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. सकाळपासूनच कडक उन्हाचा चटका जाणवत असून दुपारच्या वेळेत उकाडा असह्य होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com