Jalgaon News : पोलिस अधीक्षकांचा हद्दपारीचा सपाटा!; 10 दिवसांत 8 संशयित तडीपार!

Akash Sonar, Avinash Rathod
Akash Sonar, Avinash Rathodesakal
Updated on

जळगाव : पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गेल्या दहा दिवसांत सहा संशयितांना जिल्‍ह्यातून तडीपार केले आहे. त्याचप्रमाणे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन संशयितांना एका वर्षासाठी हद्दपार केले आहे. (Superintendent of Police Deportation of 8 suspects arrested in 10 days Jalgaon News)

पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्‍ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांतील रेकॉर्डवरील संशयितांच्या तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने रावेर तालुक्यातील ३, तर पाचोरा तालुक्यातील तीन संशयितांना तडीपार केले आहे.

एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आकाश अजय सोनार (वय २१, रा. लक्ष्मीनगर) आणि अविनाश रामेश्वर राठोड (२१, रा. रामेश्वर कॉलनी) या दोघांवर वेगवेगळे १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहावा, म्हणून पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावावरून पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दोन्ही संशयितांना वर्षभरासाठी जिल्‍ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Akash Sonar, Avinash Rathod
Nashik News : नगराध्यक्ष ते उपमुख्यमंत्री घडविणारी ऐतिहासिक रंगारवाडा शाळा कालबाह्य!

दोघांची जिल्‍ह्याबाहेर रवानगी

आकाश सोनार आणि अविनाश राठोड या दोघांचे हद्दपारीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजनराव पाटील, निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, युनूस शेख, सुनील दामोदरे, सचिन पाटील, सुधीर साळवे, हेमंत कळसकर, साईनाथ मुंडे, महिला पोलिस नाईक निलोफर सय्यद यांनी दोघांना ताब्यात घेत जिल्ह्याबाहेर रवाना केले.

Akash Sonar, Avinash Rathod
Nashik News : आजपासून नागपूर- शिर्डी दरम्यान 'समृद्धी' मार्गे बससेवा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com