जळगाव : पाडळसरे धरण तातडीने पूर्ण करा

खासदार सुप्रिया सुळे यांना पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे साकडे
Supriya Sule demand early completion of Tapi project Padalsare dam  under PM Krishi Sinchan Yojana
Supriya Sule demand early completion of Tapi project Padalsare dam under PM Krishi Sinchan Yojanasakal
Updated on

अमळनेर : खानदेशातील धुळे व जळगाव जिल्ह्यातील ६ तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण २२ वर्षांपासून रखडलेला आहे. दरवर्षी शेकडो कोटींनी किंमत वाढणारे पाडळसरे धरणाचा समावेश पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या माध्यमातून पंतप्रधान व जलशक्ती मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीकडून करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी खानदेशस्तरीय विचार संवाद परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मनोगतातून ही मागणी केली. धुळे येथील एसएसव्हीपी महाविद्यालयात लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी ही परिषद आयोजित केली होती.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सदर प्रश्नी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी बोलून येत्या जुलैमधील संसदेच्या अधिवेशनात धरणाचा विषयाला चालना देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख कार्यकर्ते सुनील पाटील, रणजित शिंदे, अजयसिंग पाटील, प्रशांत भदाणे, नरेंद्र पाटील आदींशी चर्चा झाली. समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी जनआंदोलन समितीचे वतीने सुप्रिया सुळे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. माजी आमदार प्रा. शरद पाटील व मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com