Surya Grahan 2022 : जळगावकरांनी अनुभवला खंडग्रास सूर्यग्रहणाचा आविष्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A photograph of the solar eclipse from Mahaveer Point on the Jain Hills, close to the city.

Surya Grahan 2022 : जळगावकरांनी अनुभवला खंडग्रास सूर्यग्रहणाचा आविष्कार

जळगाव : आकाशात घडणाऱ्या नैसर्गिक चमत्कारांपैकी एक म्हणजे सूर्यग्रहण. मंगळवारी (ता.२५) या वर्षातील अखेरचे खंडग्रास सूर्यग्रहण खगोलप्रेमींना अनुभवता आले. मराठी विज्ञान परिषदेच्या मार्फत जैन हिल्सच्या महावीर पॉइंट येथून विशेष दुर्बिणीच्या साहाय्याने सूर्यग्रहणाचा अद्‌भत आविष्कार बघण्याचा अनुभव काही निवडक खगोलप्रेमींनी घेतला. (Surya Grahan 2022 Jalgao peole experienced invention of Khandgras solar eclipse Jalgaon News)

हेही वाचा: Surya Grahan 2022 : जप-तप अन् गोदापात्रात अंघोळ..!; भाविकांची रामकुंडावर गर्दी

या उपक्रमाचे यु ट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यालाही खगोलप्रेमींनी चांगला प्रतिसाद दिला. संध्याकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी सूर्यग्रहणाला सुरवात झाली. ५ वाजून ४० मिनिटांनी चंद्राने सूर्यबिंबाला २५ टक्के झाकले आणि ५ वाजून ५८ मिनिटांनी ग्रहणातच सूर्यास्त झाला. या प्रसंगी मराठी विज्ञान परिषदेचे अमोघ जोशी, दिलीप भारंबे, डॉ. कल्पना भारंबे, रवींद्रसिंग पाटील, सौरभ भारंबे, माधुरी चौधरी, किरण वंजारी, रेवती वंजारी, ओवी, हर्ष, अमोल जोशी, भूपेश सूर्यवंशी, आराध्य सूर्यवंशी आणि खगोलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा: Nashik : शहरात धावणार Electric Bus; NMCचा केंद्र शासनाला पुन्हा प्रस्ताव

टॅग्स :Jalgaonyoutube live