
Jalgaon News : दर्ग्याच्या झेंड्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश
जळगाव : विटनेर (ता. जळगाव) येथील एका दर्ग्यावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वजाप्रमाणे झेंडा (Flag) लावल्याचे १८ जानेवारीस आढळले होते. (taluka court ordered to file case after it was found that flag of Pakistan was planted on dargah jalgaon news)
या प्रकरणी तक्रार करूनही एमआयडीसी पोलिसांनी दखल घेतली नाही. परिणामी, न्यायालयात दाद मागितल्यानंतर तालुका न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
विटनेर गावालगत असलेल्या दर्ग्यावर मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा व जादूटोणा केला जात असल्याचे तक्रारदार हेमंत गुरव यांचे म्हणणे आहे. दर्ग्यावर जाऊन पहाणी केली असता, तेथे पाकिस्तानचा राष्ट्रध्वजाप्रमाणे झेंडा आढळून आला.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
त्यांनी तत्काळ याबाबत पोलिसपाटील व एमआयडीसी पोलिसांना कळविले. तेव्हा नेरी (ता. जामनेर) येथील गोपाल कहार याने लावला असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह डीबी पथकाने नेरी येथून गोपाल कहार याला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले होते.
त्याची चौकशी करून पोलिसांनी त्याला सेाडून दिले होते. पोलिस अधीक्षकांना याप्रकरणी तक्रार देण्यात आली. तरीही कारवाई होत नसल्याने न्यायालयात दाद मागण्यात आली. न्यायाधीश जे. एस. केळकर यांच्या न्यायालयाने एमआयडीसी पोलिसांना चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे व या प्रकरणाचा अहवाल एक महिन्यात चौकशीअंती सादर करण्याचे आदेश दिले.