Jalgaon Crime News : पोलिसांनी पकडली वाळूची चोरटी वाहतूक

sand smuggler
sand smuggleresakal

जळगाव : तालुक्यातील सावखेडा शिवारातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर शुक्रवार (ता. २७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तालुका पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (taluka police arrested tractor that smuggled sand from Savkheda Shivar Jalgaon crime news)

सावखेडा शिवारातून वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी सावखेडा शिवारातील मराठी शाळेजवळ वाळूची चोरटी वाहतूक करणारे विनाक्रमाकांचे ट्रॅक्टर पकडले.

चालकाकडे वाळू वाहतुकीबाबत कुठलाही परवाना नसल्याने पोलिसांनी एक ब्रॉस वाळूसह ट्रॅक्टर जप्त केले आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

sand smuggler
Success Story : जमीनदोस्त केळीला विक्रमी भाव! तांदलवाडी येथील महाजन कुटुंबाची किमया

याप्रकरणी पोलिस नाईक रामकृष्ण इंगळे यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिसांत नितीन किसन कुंभार (रा. पिंप्राळा, जळगाव) याच्याविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार अनिल फेगडे तपास करीत आहेत.

sand smuggler
Jalgaon News : बायकोच्या मैत्रिणीलाच लग्नासाठी Blackmailing

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com