गौण खनिज उत्खननाकडे तहसीलदारांचे दुर्लक्ष

Mineral Extraction
Mineral Extractionesakal

चाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील बोढरे शिवारात गत महिन्यापासून अवैध गौण खनिजाचे उत्खनन (minor mineral extraction) सुरु आहे. याबाबत शेतकरी बचाव समितीने तहसीलदारांकडे (Tahsildar) वारंवार तक्रारी केल्या. परंतु महिना उलटला तरीही अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे महसूल विभाग (Revenue Department) गप्प का, असा सवाल सचिव भीमराव जाधव यांनी केला आहे. (Tehsildars negligence towards minor mineral extraction Jalgaon News)

तालुक्यातील बोढरे-शिवापूर शिवार हे पर्यावरण झोनमध्ये मोडणारे दोन गावे आहेत. याच शिवारातील चिचबारी पाझर तलावातून काही कंपन्यांकडून विनापरवाना मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या गौण खनिजांचे उत्खनन होत आहे. याबाबत शेतकरी बचाव कृती समितीचे सचिव भीमराव जाधव यांनी ३० मे रोजी तहसीलदार कार्यालयात लेखी तक्रार दिली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, बोढरे शिवारातील चिचबारी पाझर तलावातून अवैध्यरित्या गौण खनिजाचे उत्खनन होत आहे. सदर उत्खनन हे बेकायदेशीर होत आहे.

असा संशय असून याची सखोल चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई कारण्याबाबद सचिव भीमराव जाधव यांनी अर्जात नमूद केले होते. मात्र तहसील कार्यालयांनी सदर विषय गांभीर्याने घेतला नाही. म्हणून आजही गौण खनिजाचे उत्खनन अधिक गतीने होत आहे. अद्यापपर्यंत सुमारे ५० पेक्षा जास्त मोठ्या ढंपर गाड्याने तिथली माती, मुरूम, दगड धोंडे, वाहून नेले आहे. त्यामुळे एक महिन्याचा विलंब पाहता उत्खनन हे बेकायदेशीर असल्याचे वाटू लागले आहे. असे भीमराव जाधव यांनी सोमवारी (ता. २७) तसीलदार मोरे याना दिलेल्या स्मरणपत्रात म्हटले आहे. त्यात त्यांनी सांगितले आहे की, सदर गौण खनिजांचे उत्खनन हे कायदेशीर असल्यास लेखी खुलासा देण्यात यावा, अथवा बेकायदेशीर असल्यास येत्या दोन दिवसाच्याआत कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी स्मरणपत्राद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.

Associated Media Ids :

Remarks :

गौण खनिज उत्खननाकडे तहसीलदारांचे दुर्लक्ष

Audit History:

Date/Time Description ActionBy

6/28/2022 1:50:31 PM Story received from B-CHALISGAON jeevan.chavan

6/28/2022 9:07:49 PM Story Edited ssantosh

6/28/2022 9:08:34 PM Proof and Move Story to Pages: JALTDY2 ssantosh

6/28/2022 9:08:38 PM Story marked as Ready to Pages: JALTDY2, & Locations:

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com