खानदेशवासीयांचा जीवनदायिनी तापीला 108 मीटर साडीचा आहेर

श्रीक्षेत्र चांगदेव येथे तापी जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
Tapi River
Tapi Riveresakal

चांगदेव (ता. मुक्ताईनगर) : खानदेशवासीयांची जीवनदायिनी असलेल्या तापीनदीचा आज (ता. ६) जन्मदिन. त्यानिमित्ताने श्रीक्षेत्र चांगदेव येथे तापी जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. आज आषाढ शुद्ध सप्तमीला तापीचा जन्म झाल्यामुळे या पर्वावर श्रीक्षेत्र चांगदेवला मुक्ताईनगर तालुका शिवसेनाप्रमुख छोटू भोई व भारती भोई या दांपत्याच्या हस्ते तापी नदीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यांच्या समवेत नावाडी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र म्हैसरे व सुनंदा म्हैसरे तसेच नावाडी संघटनेचे सचिव संजय भोई व प्रतिभा भोई यांच्यासह अकरा जोडप्यांच्याहस्ते तापीमाईचे पूजन करून ओटी भरण्यात आली.

या वेळी सुरत येथून अखिल भारतीय जीण माता सेवा संघ सुरत यांच्यामार्फत तापीमाईच्या जन्मोत्सवासाठी १०८ मीटर लांबीच्या साडीचा आहेर देण्यात आला. ही साडी अकरा जोडप्यांच्या हस्ते तसेच उपस्थित नावाडी संघटनेचे सदस्य व भाविकांच्या हस्ते तापीमाईला अर्पण करण्यात आली.

Tapi River
शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा; ...असे असतील दर

सकाळी तापी मातेची प्रतिमा आणि पाण्याने भरलेला घट यांची शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा वाजंत्रीच्या गजरात पताका घेऊन तापीमाईचा जयघोष करीत नदी किनारी जाऊन जन्मोत्सवासाठी आणलेली साडी ही नावाडी संघटनेचे सदस्य उपस्थित असलेले ग्रामस्थ यांनी धरून १०८ मीटर लांबीच्या साडीचा आहेर नौकांद्वारे किनाऱ्यावरून तापीपात्रात नेऊन चुनरी, खण नारळ व सोळा श्रृंगार अर्पण करण्यात येऊन तापीमाईची महाआरती करण्यात आली.

‘तापी’ला का म्हणतात सूर्यकन्या?

तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात असलेल्या मुलताई या गावातून झाला आहे. तापी नदी ही सूर्यकन्या असून, प्राचीन ग्रथांनुसार तापीचा जन्मसूर्याच्या तीव्र उष्णतेमुळे स्वतःला वाचविण्यासाठी झाला आहे. ती सूर्य देवतेची कन्या आहे. तापीचा अर्थ ताप या संस्कृतमधील शब्दावरून घेतलेला आहे. यामुळेच तिला तापी, तपती, भद्रा, आदिगंगा अशा अनेक नावाने तापी नदी ओळखली जाते. खानदेशच्या तापी किनाऱ्यावर श्रीक्षेत्र चांगदेवपासून पुढे श्रीक्षेत्र मेहूण येथे आदिशक्ती मुक्ताई तापीतीरावर गुप्त झाल्या आहेत. त्यानंतर पुढे मांगलवाडी येथे मंगलेश्वर हे शिवालय, तसेच पुढे उदळी, सिंगत मार्गे रामेश्वर, शहादा प्रकाशा अशी बरीचशी देवालये या तापी किनाऱ्यावरती आहेत. या देवालयाच्या आख्यायिका तापी नदीशी जुळत्या असून, प्रत्येक किनाऱ्यावर खानदेशवासीय तापी नदीचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.

Tapi River
टेक्नोसेव्ही वास्तुविशारद झळकणार मनपाच्या संकेतस्थळावर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com