Jalgaon Crime Update : दागिने रेाकड हाती लागेल नाही म्हणुन भांडेच चोरले

Crime News
Crime Newsesakal
Updated on

जळगाव : गणेश कॉलनीच्या विष्णूनगरात बंद दाराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील तांबे-पितळाचे भाडे चोरून नेले.

विष्णूनगरमध्ये निवृत्त मुधकर नेहते कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. सध्या ते ठाण्यात राहण्यास गेले आहेत. ३ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद घराची रेकी करून दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला.(Theft Case Jewels not stolen so they stole to pot Jalgaon Crime News)

Crime News
Jalgaon : उच्च न्यायालयाची धरणगाव नगरपरिषदेतील 20 कोटी गैरव्यवहार प्रकरणी कारणे दाखवा Notice

कपाटांसह इतर ठिकाणी शोधाशोध करूनही रोकड, दागिने हाती न लागल्याने चोरट्यांनी चक्क घरातील तांबे-पितळाचे भांडे चोरून नेले. नेहते कुटुंबीय बुधवारी (ता. २) परतल्यावर त्यांना घराचा कडीकोयंडा तोडल्याचे आढळून आले.

आत गेल्यावर त्यांना चोरी झाल्याची खात्री होताच त्यांनी तत्काळ जिल्हापेठ पोलिसांना कळविले. याबाबत नेहते यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. महेंद्र पाटील तपास करीत आहेत.

Crime News
Winter Season : सकाळी थंडी अन् दुपारी कडक उन्हाने नागरिक हैराण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com