Jalgaon News : अरेच्चा! स्मशानभूमीतील लोखंडी रॅकची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stolen ironstones from graveyards.

Jalgaon News : अरेच्चा! स्मशानभूमीतील लोखंडी रॅकची चोरी

जळगाव : मेहरुण उद्यानाजवळील तरणतलावाच्या पाठीमागे कंजरभाट समाजाची स्मशानभूमी (cemetery) आहे.

या स्मशानभूमीत मृतदेह दहनासाठी तयार केलेल्या ओट्यांवर लावलेल्या बीड धातूच्या जाळ्यांचे कठडे आणि लोखंडी गेट चोरट्यांनी लंपास केले. (Theft of an iron rack from cemetery jalgaon news)

शुक्रवारी (ता. २४) काही समाजबांधव स्मशानभूमीत साफसफाई करण्यासाठी गेले असता, त्यांना लोखंडी गेट कुणीतरी उपटून नेल्याचे आढळून आले. आत आल्यानंतर मृतदेह दहन करण्यासाठी ओट्यांवर लावलेल्या बीड धातूच्या जाळ्यांचे कठडे काढून नेल्याचे आढळून आले.

त्यांनी कंजरभाट समाजाच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली. कंजरभाट समाजाच्या शिष्टमंडळाने औद्योगीक वसाहत पोलिस ठाणे गाठत निरीक्षक जयपाल हिरे यांची भेट घेतली.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

कंजरभाट समाजाचे अध्यक्ष सावन गागडे, उपाध्यक्ष बिरजू नेतलेकर, सूर्यभान अभंगे, राहुल नेतलेकर, वीर दहियेकर, विजय अभंगे, संतोष रायचंदे, उमेश माछरे, प्रदीप नेतलेकर, संतोष इंद्रेकर, गौतम बागडे, पंकज नेतलेकर आदींनी चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी केली.

टॅग्स :Jalgaonrobberythief