here is no increase in rate of ready reckoner
here is no increase in rate of ready reckoner esakal

Jalgaon News : रेडीरेक्नरच्या दरात यंदा वाढ नाही; 2022 चे दर कायम राहणार

Published on

जळगाव : स्थावर मालमत्तांचे दर दरवर्षी मुद्रांक विभागामार्फत जाहीर केले जातात. यंदा या दरात कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आली नसून २०२२ चे दर कायम राहणार असल्याची माहिती जिल्हा मुद्रांक विभागाने दिली. (There is no increase in rate of ready reckoner this year rate of 2022 will remain same jalgaon news)

महाराष्ट्र मुद्रांक (मालमत्तेचे वास्तव बाजार मूल्यनिर्धारित करणे) नियम १९९५ च्या नियम क्रमाकं ४ (३) अन्वये दरवर्षी १ एप्रिलला राज्यातील सर्व भौगोलिक क्षेत्रासाठी स्थावर मालमत्तेचे वार्षिक दर तक्ते निर्गमित करण्यात येतात.

दरवर्षी या दरांमध्ये बदल करण्यात येतो. यंदा मात्र रेडीरेक्नरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आला नसल्याची माहिती जिल्हा मुद्रांक विभागाने दिली. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १ एप्रिल २०२२ पासून अंमलात असलेले २०२२-२३ चे वार्षिकदर तक्ते, मूल्यांकन मार्गदर्शक सूचना व नवीन बांधकाम दर संपूर्ण राज्यासाठी कायम ठेवले आहेत.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

here is no increase in rate of ready reckoner
Jalgaon Municipal Corporation : गुदाम उभारण्यासाठी मनपानेच मोडले नियम! ॲड शुचिता हाडा यांचा आरोप

यंदाही कायम राहणारे दर

ग्रामीण क्षेत्रसाठी--६.९६ टक्के

प्रभाव क्षेत्र--३.९० टक्के

नगरपरिषद-नगरपंचायत क्षेत्र--३.६२ टक्के

महापालिका क्षेत्र (मुंबई वगळता)--८.८० टक्के

here is no increase in rate of ready reckoner
Jalgaon News : मोदींच्या विकासाचा जन्मदिन म्हणजे ‘एप्रिल फूल’....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com