Crime News : पोलिस ठाण्यामागील बंद कंपनीत चोरट्यांचा डल्ला

Thieves Gang in Closed Company
Thieves Gang in Closed Companyesakal

जळगाव : जळगाव औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या मागेच रुखमा इंडस्ट्रीज या बंद पडलेल्या कारखान्याच्या आवारातील वाहनांची चोरी झाल्याची तक्रार पोलिसांनी दिली आहे. सिन्थेटिक अमली पदार्थनिर्मिती प्रकरणात १३ वर्षांपूर्वी केंद्रीय अबकारी विभाग (डीआरआय)ने केलेल्या कारवाईत हा कारखाना जसाच्या तसा सील करण्यात आलेला होता. तेव्हा आवारात उभी वाहने तशीच्या तशीच ठेवण्यात आली. याच वाहनांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

रुखमा इंडस्ट्रीजमध्ये डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या (डीआरआय) मुंबई विभागातील अधिकाऱ्यांनी १४ डिसेंबर २०१३ ला छापा टाकून सुमारे ११८ कोटी रुपये किमतीचे केटामाइन हा सिन्थेटिक अमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. या प्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नितीन चिंचोले यांच्या मालकीचा हा कारखाना तब्बल नऊ वर्षांपासून बंद अवस्थेतच आहे. एप्रिल २०१९ मध्ये खटल्याचा निकाल लागून यातील सात आरोपींना दोषी ठरवत पाच निर्दोष मुक्त झाले होते.(Thieves gang in closed company behind Police station Jalgaon Crime News)

Thieves Gang in Closed Company
Women Harassment : तोतया Anticorruption Officer अन्‌ बोगस पत्रकाराचे प्रताप

केंद्रीय अबकारी विभाग (डीआरआय)ने छापा टाकलेल्या दिवशी रुखमा इंडस्ट्रीजच्या पार्किंगमधील टाटा कंपनीची हिरव्या रंगाची क्रेन (एमएच १९, बीजी २५३६), काळ्या रंगाची स्कोडा कार (एमएच ०४, डीआर ६२६२), पॅशनप्रो मोटारसायकल (एमएच १९, बीएन ९२४३) अशी वाहने चोरट्यांनी १४ ऑक्टोबर २०२२ पूर्वी चोरून नेली होती. या प्रकरणी पोलिस कर्मचारी चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, इम्रान सय्यद तपास करीत आहेत.

संशयित अटकेत

पोलिस निरीक्षक प्रतापसिंह शिकारे त्यांच्या पथकातील अनिसोद्दीन शेख, हेमंत कळसकर, रात्रगस्तीला असताना एमआयडीसी परिसरातील हॉटेल कमल पॅराडाइज्डजवळून एक अजस्र क्रेन बंद स्कोडा कार ओढून नेत होती. बरीच वर्षे बंद असलेल्या या कारची चाके जाम झाल्याने रस्त्यावरील डांबर उडवत क्रेन ओढत असल्याने त्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी पोलिसांना फोन केला. गस्तीवरील पथक पोचल्यावर त्या क्रेनवर पोलिस रेकॉर्डवरील संशयित अमन सय्यद हा अट्टल गुन्हेगार आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. चौघांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी या चोरीची माहिती दिली.

रुखमा इंडस्ट्रीज चोरट्यांचा अड्डाच

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अगदीच पाठीमागे असलेल्या आणि गेल्या नऊ वर्षांपासून बंद अवस्थेतील रुखमा इंडस्ट्रीजमध्ये यापूर्वी अनेक वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत. भंगारमाफिया यासीन मुलतानी याने दोन वेळा परराज्यातून मागविलेल्या चोरट्यांनी गॅसकटरच्या सहाय्याने येथील साहित्य कापून नेले. भुरट्या चोरांनी मिळेल ते पळविले. कंपनी अद्यापही केंद्रीय अबकारी विभागाच्याच जप्ती ताब्यात असून, अनेक वेळा मूळ मालक विकास चिंचोले यांच्या कुटुंबीयांनी लेखी तक्रारी अर्ज पोलिसांना आणि न्यायालयात केले आहेत.

Thieves Gang in Closed Company
Jalgaon District Milk Union Fraud : खडसेंची अडचण वाढणार; पत्नीविरोधात गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com