Jalgaon News : राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत तिसरे पॅनल निवडणूक रिंगणात

Election News
Election Newsesakal

चाळीसगाव : राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीची अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतर तिसरे पॅनल होण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

रविवारी (ता. १८) संस्थेचे माजी संचालक व मॉडर्न को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन अशोक खलाणे यांच्या बँकेच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांची बैठक झाली. तीत निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. या वृत्ताला माजी संचालक खलाणे यांनी दुजोरा दिला. (Third panel in election fray for National Board of Education Jalgaon News)

Election News
Jalgaon News | पराभवाचे दुखणे खेळाच्या मैदानात काढणे हास्यास्पद : भूषण भदाणे

संस्थेचा निवडणुकीमध्ये महिन्यापासून दोन पॅनलचे उमेदवारांची पहिली प्रचारफेरी झाली असून, त्यात संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. एम. बी. पाटील, सचिव कृषिभूषण अरुण निकम व सहाय्यक सचिव डॉ. संजय देशमुख यांचे पॅनल आणि संस्थेचे माजी सचिव डॉ. विनायक चव्हाण व माजी प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांच्या पॅनलचा समावेश आहे.

दरम्यान, तिसरे पॅनल निवडणूक रिंगणात उतरणार असून, लवकरच त्यांच्या उमेदवारांची नावे पत्रकार परिषदेत जाहीर केली जाणार असल्याचे समजते.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

Election News
Jalgaon News : साकळीत हजरत सजनशाह वलींचा उर्स

तिसरे पॅनलमध्ये संस्थेचे माजी सचिव डॉ. नरेश देशमुख, माजी संचालक रोहिदास लाला पाटील, अशोक खलाणे, जिल्हा पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष किसनराव जोर्वेकर, शिवसेनेचे तुकाराम कोळी, बाळासाहेब शिनकर, कंत्राटदार प्रशांत देशमुख, महिलांमध्ये माजी संचालक (कै.) नेताजी सूर्यवंशी यांच्या पत्नी सुलोचना सूर्यवंशी, परभत राजपूत, माजी संचालक खलाणे यांचे मोठे बंधू दादा खलाणे आदींचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार(ता. २१)पासून ते सोमवार (ता. २६)पर्यंत आहे. ज्या उमेदवारांना पहिल्या दोन पॅनलप्रमुखांनी शब्द देऊनही पॅनलमध्ये घेतले नाही, त्या उमेदवारांनी सोईनुसार पॅनलमध्ये समावेश करून घेतला आहे.

मात्र, अजूनही सचिव निकम यांच्या पॅनलमध्ये एक- दोन उमेदवार, तर माजी सचिव डॉ. चव्हाण यांच्या पॅनलमध्ये एक- दोन उमेदवारांची नावे अंतिम टप्प्यात फायनल होणार आहेत. डॉ. चव्हाण यांच्या पॅनलमध्ये वाणी समाजाच्या दोन उमेदवारांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण वाणी समाजाचे अध्यक्ष शरदअण्णा मोराणकर व अशोक ब्राह्मणकर सुरवातीपासून प्रचार करताना दिसत आहेत. शेवटी येत्या २६ डिसेंबरला अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

Election News
Jalgaon News : माजी आमदार चंद्रकांत सोनवणेंना न्यायालयाचा दिलासा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com