Crime Update : दंगल प्रकरणी तिघांना अटक, पोलीस कोठडीत रवानगी

Riot Case
Riot Caseesakal

अमळनेर : ईदच्या पूर्वसंध्येला दोन गटात झालेल्या दंगलीत पोलिसांनी आणखी तीन संशयिताना अटक केली असून, तिन्ही संशयिताना न्यायालयाने १५ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रथमच दंगलीतील अज्ञात इतर संशयितांना पोलिसांनी सीसीटीव्ही पाहून शोधले आहेत.

सर्वसाधारणपणे दंगल अथवा सामूहिक गुन्ह्यात इतर अनोळखी संशयित कधीही पकडले जात नव्हते. अथवा पुराव्याअभावी सुटत होते. मात्र संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे पसरल्याने पोलिसांनी फिर्यादीतील नावांव्यतिरिक्त अज्ञात संशयितानाही शोधून काढणे सुरू केले आहेत.(Three arrested in riot case sent to police custody Jalgaon News)

Riot Case
Jalgaon : पोलीस मिळेना, अतिक्रमण हटेना!

गोंधळ घालणारे, दगडफेक करणारे कॅमेऱ्यात दिसून येत असल्याने पोलिसांनी धनंजय वसंत पाटील व रियाज बागवान यांची ओळख पटवून शाह आलमनगर, अंदरपुरा भागातून तर फिर्यादीत असलेला विशाल दशरथ चौधरी याला माळीवाडा, भोईवाडा येथील नदीकाठावरून अटक केली आहे. संशयितानी इतरांची नावे सांगितल्याने पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

तर काही संशयित अद्यापही फरार आहेत. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, योगेश महाजन, रवी पाटील, दीपक माळी, शरद पाटील यांनी रात्री उशिरा संशयिताना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्या. अग्रवाल यांनी १५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव शहरातील घडामोडींवर नजर ठेवून आहेत. संवेदनशील भागात पोलिस बंदोबस्त व गस्त लावण्यात आली आहे.

Riot Case
Jalgaon : जिल्हा दूध संघात लोणी साठ्याचा सव्वा कोटीचा गैरव्यवहार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com