कपाशी घेऊन व्यापारी फरार; 46 शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud

कपाशी घेऊन व्यापारी फरार; 46 शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक


जळगाव :
कापूस व्यापारी राजेंद्र पाटील व इतर पाच व्यापाऱ्यांनी वाडी शेवाळे (ता. पाचोरा) येथील ४६ शेतकऱ्यांचा कापूस विकत घेतला. मात्र त्याचे पैसे न देताच संशयित व्यापारी फरार झाल्याने शेतकऱ्यांनी कुटुंबीयांसाठी उपोषण सुरू केले आहे. पाचोरा जागृत जनमंच व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी उपोषणात सहभाग घेतला आहे.

निवेदनात म्हटले आहे, की वाडी शेवाळे येथे कापसाचे व्यापारी राजेंद्र पाटील व इतर पाच जणांनी मिळवून गावातील कापूस शेतकऱ्यांचा माल दरवर्षीप्रमाणे घेऊन यावर्षी मात्र अद्यापपावेतो व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे कापसाचे पैसे अदा केले नाही. सदरील कापूस त्यांनी या हंगामात घेतला असून जवळपास सर्वच शेतकऱ्यांना दरवर्षांप्रमाणे संक्रांतीला पैसे देतो म्हणून सांगितले होते. मात्र संक्रांतीला पैसे मागण्यास गेले असता त्यांना ४-८ दिवसाची वेळ मारून नेली. ११ फेब्रुवारी संध्याकाळपासून सदरील व्यापारी, पत्नी, मुलांसह गाव सोडून गेला. उपोषणात पाचोरा जागृत जनमंचचे उपाध्यक्ष निळकंठ पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव पाटील, शेतकरी गणेश निंबा पाटील, इंद्रसिंग पाटील, प्रभाकर पाटील, सुरेश पाटील, सुरेश शिंपी, विनोद धोबी, परमेश्वर गायकवाड, पंढरीनाथ पाटील, संजय पाटील, कृष्णराव पाटील आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

हेही वाचा: विकासकामांना स्थगिती आणण्याचा करंटेपणा करू नये : एकनाथ खडसे

हेही वाचा: मधमाशा नसल्या, तर माणसाचे जगणं मुश्कील होईल...

Web Title: Trader Defrauded 46 Farmers Of Millions Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..