बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा

दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे यांनी केले आहे.
traffic police
traffic policeesakal

चाळीसगाव (जि. जळगाव) : येथील पोलिसांच्या वाहतूक शाखेने काही दिवसांपासून बेशिस्त वाहतुकीसंदर्भात कारवाईची बडगा उगारला असून, एकाच महिन्यात वाहतुकीच्या विविध नियमांचे भंग करणाऱ्या सुमारे १ हजार ५०० वाहनधारकांकडून तब्बल ९ लाख २३ हजारांचा दंड वसूल केला आहे. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे यांनी केले आहे.

शहर पोलिस वाहतूक शाखेचे स्वतंत्र कार्यालय कार्यान्वित झाल्यापासून बेशिस्त वाहतुकीला काही प्रमाणात लगाम बसेल, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात कुठलाही फरक पडला नव्हता वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नसल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत होती. विशेष म्हणजे पोलिसांकडून कारवाई करूनही वाहतुकीला शिस्त लागलेली नाही. मुख्य रस्त्यांवरील विशेषतः काही बॅंकांसह दुकानांसमोर रस्त्यावरील वाहतुकीला अडसर होईल, अशा पद्धतीने वाहने लावली असतात. येथील वाहतूक शाखेने मे महिन्यात वाहतुकीच्या विविध नियमांचे भंग करणाऱ्या १ हजार ५५३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ९ लाख १७ हजार ५०० पाचशे रुपयांचा दंड वसूल केला आहे.

traffic police
खऱ्या उमेदवाराच्या नावाने सादर केली खोटी कागदपत्रे; दोघांविरुद्ध गुन्हा

कारवाई सुरूच राहणार

वाहनधारकाने आपल्या वाहनाची कागदपत्रे जवळ बाळगली पाहिजेत. वाहन चालविण्याचा परवाना काढल्याशिवाय वाहने चालवू नये. शिवाय रस्त्यावर वाहतुकीला अडसर ठरेल, अशा पद्धतीने वाहने लावू नये, असे आवाहन येथील वाहतूक शाखेने केले आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे कर्मचारी विजय पाटील, अरुण बाविस्कर, हेमंत शिरसाठ, श्रीराम बोरसे, नरेंद्र सूर्यवंशी, रावसाहेब पाटील, बापू पाटील, सचिन अडावदकर, संदीप तहसीलदार, वंदना राठोड, प्रशांत पाटील, दीपक पाटील, नरेंद्र पाटील, राजेंद्र सोनवणे, दीपक जगताप, विजय निकम, भास्कर भोसले, राजू जाधव, सुनील खैरनार, मुकेश बिराडे, चंद्रधर पवार, राजेंद्र निकम व विजय निकम यांनी केली.

traffic police
जळगाव जिल्ह्यात सव्वासात लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या

''प्रत्येक वाहनधारकने वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहने चालवावीत. लहान मुलांच्या हाती वाहने देऊ नये. नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे.'' - तुषार देवरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, चाळीसगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com