जळगाव : आकाशवाणी चौकातील ‘सर्कल’मुळे वाहतूक अनियंत्रित

महिनाभरात प्रत्यय; चारही बाजूंना बेशिस्त पार्किंगने वाढली डोकेदुखी
जळगाव : आकाशवाणी चौकातील ‘सर्कल’मुळे वाहतूक अनियंत्रित
जळगाव : आकाशवाणी चौकातील ‘सर्कल’मुळे वाहतूक अनियंत्रित sakal

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणात आकावाणी चौकात रोटरी सर्कलचे काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दावा केल्यानंतरही सर्कलमुळे या ठिकाणी वाहतूक कमालीची अनियंत्रित होत असून, महिनाभरापासून त्याचा प्रत्यय येतोय. चौकातील चारही बाजूंचे अतिक्रमण काढल्यानंतर त्या ठिकाणी होणाऱ्या बेशिस्त पार्किंगने डोकेदुखी अन्‌ पर्यायाने अपघातांचा धोकाही वाढला आहे.

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. दोन-अडीच वर्षांपासून रखडलेले हे काम आता अंतिम टप्प्यात असले, तरी कामात विविध टप्प्यांवर होत असलेल्या प्रस्तावित कामांमुळे वादंग उद्‌भवत आहेत.

जळगाव : आकाशवाणी चौकातील ‘सर्कल’मुळे वाहतूक अनियंत्रित
औरंगाबाद : प्रियदर्शनी उद्यानाला पिकनिक स्पॉट बनवू नका

सर्कलच्या कामाची अडचण

या कामाच्या टप्प्यात आकाशवाणी चौकात रोटरी सर्कलचे काम आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले. सर्कलचे काम प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर त्याला विविध संस्था, संघटना व तज्ज्ञांकडून विरोध झाला.

३० मीटर व्यासाचे हे सर्कल असून, ते या चौकात योग्य नाही, त्याऐवजी भुयारी मार्ग (अंडरपास) करावा, या मागणीसाठी सर्कलचे काम बंद पाडण्यापर्यंत आंदोलन झाले. मात्र, चौकात विविध सुविधा देण्याच्या ग्वाहीनंतर हे काम पुन्हा सुरू झाले.

चौकात वाहतुकीची कोंडी

जसे या सर्कलचे काम पुढे सरकत आहे, तशा या चौकातील वाहतुकीच्या नियमातील मर्यादाही उघड होत आहेत. सर्कलच्या चारही बाजूंनी वेगाने येणारी वाहने सर्कलभोवती एकत्रित धडकतात. वेग नियंत्रित केला तरच अपघात टळतो. मात्र, अपघाताचा धोका कायम असतो.

जळगाव : आकाशवाणी चौकातील ‘सर्कल’मुळे वाहतूक अनियंत्रित
नांदेड : मोकळ्या हवेत फिरण्यासह व्यायामाकडे कल

बेशिस्त पार्किंगने कोंडी

चौकात चारही बाजूंना असलेले अतिक्रमण काढण्यात आले. वीजखांब व डीपीही बाजूला करण्यात आली. चारही बाजूंनी रस्ते रुंदीकरण करण्यात आले. मात्र रुंद झालेल्या रस्त्यांवर आता चारही दिशांना डाव्या बाजूला बेशिस्त पार्किंग होत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.

चौकालगतच मजूर फेडरेशन व गणपती हॉस्पिटलसमोर मोठ्या प्रमाणात बेशिस्त पार्किंग दिवसभर असते. सकाळी व सायंकाळी हॉटेल मुरलीमनोहरच्या बाजूने व लाली पान सेंटरसमोर खासगी बसचे बेशिस्त पार्किंग दिसते. तापी महामंडळाच्या कार्यालयालगत दत्तमंदिराजवळ कालीपिली, ॲपेरिक्षांची गर्दी झाल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com