bull with farmer drown in girana river base
sakal
जळगाव - दिवस उजाडताच नित्याच्या शेतीकामासाठी नेहमीप्रमाणे शेतकरी-सालदार बैलजोडीसह आज गिरणा नदी ओलांडत होते. नदीपात्रात असलेल्या कमरेएवढ्या पाण्यातून जाताना अचानक बैलांसह गाडे उचकटून बुडाले. या दुर्घटनेत दिलीप रामभाऊ कल्याणकर (वय ५५) यांचा मृत्यू ओढवला. गाडे बैलांसकट बुडाल्याने बैलेही मृत्युमुखी पडली आहेत.