Truck Bike Accident in Jalgaon
sakal
जळगाव - शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्क चौफुली येथे सोमवारी (ता. २७) सकाळी आठच्या सुमारास भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओम सुनील गिरी (वय २५) असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती.