Jalgaon News : भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची तृतीयपंथींनी स्वीकारली जबाबदारी

Transgender have accepted responsibility of drinking water for devotees
Transgender have accepted responsibility of drinking water for devoteesesakal

Jalgaon News : येथील पाताळेश्वर मंदिर जीर्णोद्धार समिती, ग्रीन ॲपल इव्हेंट व पत्रकार बांधवांच्यावतीने ३० एप्रिल ते ६ मे दरम्यान आयोजित शिव महापुराण कथा व महारुद्राभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था येथील तृतीयपंथीयांनी (किन्नरांनी ) स्वतःहून स्वीकारली असून, पाण्याचे कितीही जार लागले तरी ते पुरवू असा निर्धार त्यांनी केला आहे. (Transgender have accepted responsibility of drinking water for devotees jalgaon news)

भडगाव रोड भागातील कैलादेवी मंदिरामागील जागेत भगवान शिव प्रभू नगरी उभारण्यात आली असून, येथे शिव महापुराण कथेसाठीची जोरदार तयारी सुरू आहे.

बुधवारी (ता. १९) शहरातील सीमा जान, सायरा जान, मुनमून जान, शांतीसिमा जान, गंगोत्री सीमा जान, रेणुका जान, सोनी जान, दिव्या जान, फातमा जान, ईश्वरी जान यांनी भगवान शिव प्रभू नगरीला भेट देऊन शिवचरणी आपली सेवा देण्याची तयारी दर्शवली व ३० एप्रिल ते ६ मे दरम्यान कथा व अभिषेकासाठी येणाऱ्या हजारो महिला, पुरुष भाविकांना पिण्याचे थंडगार पाणी पुरवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Transgender have accepted responsibility of drinking water for devotees
Jalgaon News : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्हा राज्यात प्रथम

मोहन अग्रवाल, मुन्ना अग्रवाल, संदीप महाजन यांना त्या संदर्भातील माहिती देऊन शिवचरणी सेवा बनविण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा या तृतीयपंथीयांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या दातृत्वाचे कौतुक होत आहे.

Transgender have accepted responsibility of drinking water for devotees
Jalgaon News : तरसोद फाट्याजवळील उड्डाणपुलाच्या कामाचा वेग मंदावला; कामावर मजुरांची कमतरता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com