ट्रक मागे घेताना तरुणाला चिरडले; उपचरादरम्यान तरुणाचा मृत्यू | Latest Marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

ट्रक मागे घेताना तरुणाला चिरडले; उपचरादरम्यान तरुणाचा मृत्यू

जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरातील ट्रान्स्पोर्टनगरात चालक ट्रक मागे घेत असताना चाकाखाली येऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अशफाक खान गुलजार खान (वय ३६, रा. इस्लामपुरा, भवानी पेठ) जळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. (Truck crushes young man while reversing in jalgaon crime Latest Marathi news)

हेही वाचा: नाशिकमध्ये OBCच्या एका जागेत घट; 36 ऐवजी 35 नगरसेवक

अशफाक खान गुलजार खान ८ जुलैला रात्री साडेआठच्या सुमारास एमआयडीसीतील ट्रान्स्पोर्टनगरामध्ये आतेभाऊ हुसेन खान यांच्या गॅरेजवर येत होता. त्या वेळी गॅरेजसमोर टाटा ट्रक (एमएच १९, सीवाय ५३१०)वरील चालकाने ट्रक मागे घेताना पायी येत असलेला अशफाक खान गुलजार खान याला जोरदार धडक दिली.

यात अशफाकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशफाकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मृत अशफाकचा भाऊ हुसेन खान याने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात ट्रक (एमएच १९, सीवाय ५३१०) अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक नीलेश गोसावी तपास करीत आहेत.

हेही वाचा: देवळाली, भगूरचे महापालिकेत विलीनीकरण शक्य?

Web Title: Truck Crushes Young Man While Reversing In Jalgaon Crime Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..